Varun Narayanan's victory in Keona Kite Surfing Dainik Gomantak
क्रीडा

वरुण नारायणनचा चार शर्यती जिंकून किओना काईट सर्फिंगमध्ये दबदबा

स्पर्धा मांद्रे समुद्रकिनारी सुरू

दैनिक गोमन्तक

पणजी : राष्ट्रीय काईट सर्फिंग स्पर्धेत गतविजेत्या वरुण नारायणन याने चार शर्यती जिंकून दबदबा राखला, तसेच स्पर्धेत पदार्पण करणारी गोव्याची किओना रजनी हिनेही उल्लेखनीय सर्फिंग करून छाप पाडली. स्पर्धा मांद्रे (Mandrem) समुद्रकिनारी सुरू आहे.

वाऱ्याचा वेग कमी असल्यामुळे रविवारी एकही शर्यत होऊ शकली नव्हती. सोमवारी वाऱ्याच्या 12 ते 15 नॉट्स वेगामुळे सहभागी सर्फर्स उत्साहित झाले.

स्पर्धेच्या अ गटात वरुण नारायणन सध्या अव्वल स्थानी असून गोव्यातील (goa) अनुभवी सर्फर फिलिप डार्टनेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. या गटात अविश्मा मट्टा तिसऱ्या स्थानी आहे.

किओना स्पर्धेतील सर्वांत युवा सर्फर आहे. सोमवारी तिने कमाल केली. ब गटात तिने अनुभवी स्पर्धकांना मागे टाकत चारपैकी तीन शर्यती जिंकल्या. अन्य एका शर्यतीत अर्जुन मोठा याने पहिला क्रमांक मिळवला. किओनाने अर्जुनसह डेरिक मिनेझिस, युली, कबीर या अनुभवींना मागे टाकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Dogs Sterilization: नसबंदीसाठी खर्च 3,500, सरकारी मदत फक्त 1,800! निधीच्या नियमांवर कोर्टाचे ताशेरे; अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा

Aggressive Dog Breeds Ban: 'आक्रमक' कुत्र्यांच्या बंदीचा निर्णय सरकारने तूर्त गुंडाळला, केंद्राच्या निर्णयाविरोधात याचिका; न्यायालयीन निकालाची गोवा सरकारला प्रतीक्षा

RBI Repo Rate Hike: होम लोन, कार लोन घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! आरबीआयने रेपो रेटमध्ये केली 'इतक्या' टक्क्यांची वाढ; 4 वर्षांनंतर घेतला मोठा निर्णय

Teacher Regularization: तासिका शिक्षकांना मोठा दिलासा! 10 वर्षांहून अधिक सेवा केलेल्यांना नियमित करण्याची प्रक्रिया 15 दिवसांत सुरू; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Car Accident: टेनिस सामना खेळून परतताना काळाचा घाला! कारच्या भीषण अपघातात तीन खेळाडूंचा मृत्यू; 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT