Vaishali and Rameshbabu Praggnanandhaa Create History:
बुद्धीबळ खेळात भारताला गेल्या काही महिन्यात चांगले यश मिळाले आहे. यात वैशाली रमेशबाबू आणि रमेशबाबू प्रज्ञानानंद या भावा बहिणींचाही मोठा वाटा राहिला आहे. या भावा-बहिणीच्या नावावर आता एक मोठा विश्वविक्रम रचला गेला आहे.
वैशालीने शुक्रवारी आयव्ही एल लोब्रेगेट ओपन स्पर्धेत खेळताना 2500 फिडे रेटिंग (FIDE) पूर्ण केल्यानंतर ग्रँडमास्टर किताब मिळवला. ती ग्रँडमास्टर होणारी भारताची तिसरीच महिला ठरली आहे. तिच्यापूर्वी ग्रँडमास्टर होण्याचा मान कोनेरू हंपी आणि हरिका द्रोनावल्ली यांनी मिळवला होता.
22 वर्षीय वैशालीने या स्पर्धेच्या दुसऱ्या राउंडमध्ये तुर्कीच्या एमएम तामेर तारिक सेल्बेसला (2238) पराभूत केले. यासह ग्रँडमास्टर किताब मिळवला. यामुळे वैशाली आणि प्रज्ञानानंद हे जगातील पहिलेच भाऊ-बहिण ठरले आहेत, ज्यांनी ग्रँडमास्टर किताब मिळवला आहे.
वैशालीचा धाकटा भाऊ प्रज्ञानानंदने देखील काही वर्षांपूर्वीच ग्रँडमास्टर किताब मिळवला होता. त्यामुळे आता त्यांची ग्रँडमास्टर असणारी पहिला भाऊ-बहिणीची जोडी आहे.
वैशाली आणि प्रज्ञानानंद लहानपणापासूनच बुद्धीबळ खेळतात. वैशालीला आधी त्यांच्या वडिलांनी बुद्धीबळाची गोडी लावली होती. त्यानंतर प्रज्ञानानंदलाही या खेळाची आवड लागली.
या दोघा भाऊ-बहिणीने एकत्र देखील अनेक मेडल्स जिंकले आहेत. त्यांनी ऑलिम्पियाडमध्ये त्यांनी दुहेरीत कांस्य पदक, आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदकही जिंकले आहे.
या यशाबद्दल Chess.com शी बोलताना वैशाली म्हणाली, 'अखेर हा किताब मिळवून मी खूप खूश आहे. मी स्पर्धेवरही लक्ष केंद्रित करत आहे, पण मला ग्रँडमास्टर किताब मिळाल्याने मी खूप खूश आहे.'
'मी जेव्हापासून बुद्धीबळ खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून ठेवलेले ध्येय मी अखेर पूर्ण केले. मी यापूर्वी याच्या खूप जवळ होते, मी खूप उत्सुकही होते, पण माझ्यावर थोडा दबावही होता. माझ्या मध्ये खेळ चांगला झाला नव्हता, पण मी विजय मिळवण्यात यशस्वी ठरले. मी कँडिडेट्ससाठी पात्र ठरले असून आशा आहे की ही स्पर्धा जिंकेल.'
दरम्यान, वैशालीच्या या विजयामुळे तिचे भारतभरातून कौतुक केले जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.