R Praggnanandhaa Video: वन्नकम चेन्नई! चेस वर्ल्डकपचा उपविजेता प्रज्ञानानंदाचे ग्रँड वेलकम

R Praggnanandhaa Video: फिडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा उपविजेता आर प्रज्ञानानंद भारतात परतल्यानंतर त्याचे जल्लोषात स्वागत झाले.
R Praggnanandhaa
R PraggnanandhaaDainik Gomantak
Published on
Updated on

R Praggnanandhaa grand welcome in Chennai :

भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद अजरबैजानमध्ये फिडे वर्ल्डकप खेळल्यानंतर बुधवारी चेन्नईत परतला. यावेळी त्याचे जल्लोषात स्वागत झाले.

18 वर्षीय प्रज्ञानानंद फिडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळला होता. अखेरपर्यंत झुंज दिल्यानंतर प्रज्ञानानंदला रापिड फायरमध्ये दिग्गज मॅग्नस कार्लसनविरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

फिडे वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळणारा प्रज्ञानानंद सर्वात युवा बुद्धीबळपटू ठरला. तसेच अंतिम सामन्यात पोहचणारा तो भारताचा दुसराच खेळाडू ठरला. यापूर्वी विश्वनाथन आनंद यांनी असा कारनामा केला होता. विश्वनाथन आनंद यांनी 2002 साली बुद्धीबळ वर्ल्डकप जिंकला होता.

R Praggnanandhaa
FIDE Chess World Cup Final: प्रज्ञानानंदाचे विश्वविजयाचे स्वप्न भंगले! फायनलमध्ये कार्लसन पडला भारी

दरम्यान, या यशानंतर प्रज्ञानानंदचे चेन्नईत भव्य स्वागत झाले. तो जेव्हा चेन्नई विमानतळावर आला, तेव्हा मोठी गर्दी जमली होती. यावेळी चेन्नईच्या विमानतळावर त्याच्या स्वागतासाठी त्याचे शाळेतले मित्र, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे प्रतिनिधी आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

या स्वागतावेळी प्रज्ञानानंद म्हणाला, 'मी इतक्या लोकांना इथे आलेले पाहून खूप खूश आहे. हे बुद्धीबळासाठी चांगले आहे.'

प्रज्ञानानंद आणि कार्लसन यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यातील पहिले दोन गेम ड्रॉ राहिले होते. पहिला गेम 35 चालींनंतर ड्रॉ झाला होता. तसेच दुसरा गेम 30 चालींनंतर ड्रॉ करण्यासाठी दोन्ही खेळाडूंनी सहमती दर्शवली होती. त्यामुळे 24 ऑगस्ट रोजी टायब्रेकर खेळवण्यात आला होता. टायब्रेकरमध्ये पहिल्या फेरीतच कार्लसनने त्याचे विश्वविजेतेपद निश्चित केले.

R Praggnanandhaa
FIDE Women’s World Cup 2023: महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत इतिहास रचणारी कोण आहे अलेक्झांड्रा गोर्याचकिना, वयाच्या 6 व्या वर्षी...

दरम्यान प्रज्ञानानंद फिडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात खेळल्याने तो पुढीलवर्षी कॅनडामध्ये होणाऱ्या वर्ल्डकपसाठीही पात्र ठरला. त्याने फिडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

आनंद महिंद्रांकडून खास भेट

भारतातील बिझनेसमन आनंद महिंद्रा यांनी प्रज्ञानानंदाच्या यशाबद्दल त्याचे कौतुक करताना त्याच्या पालकांसाठी खास भेटीची घोषणा केली. त्यांनी त्याच्या पालकांचे त्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल कौतुक केले. तसेच त्यांना महिंद्रा XUV4OO EV कार भेट देणार असल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com