Vaibhav Sooryavanshi 25-ball hundred Dainik Gomantak
क्रीडा

Vaibhav Sooryavanshi: 50 चेंडूंचे चॅलेंज 25 चेंडूंतच संपवले! वैभव सूर्यवंशीचे मैदानावर वादळ, ठोकलं शानदार शतक Watch Video

Vaibhav Suryavanshi 25 ball century: क्रिकेटचे मैदान कोणतेही असो, परिस्थिती कशीही असो, जेव्हा २२ जॉर्डच्या पट्टीवर वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ उभे असते, तेव्हा धावांचा पाऊस पडणार हे निश्चित असते.

Sameer Amunekar

क्रिकेटचे मैदान कोणतेही असो, परिस्थिती कशीही असो, जेव्हा २२ जॉर्डच्या पट्टीवर वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ उभे असते, तेव्हा धावांचा पाऊस पडणार हे निश्चित असते. असाच काहीसा थरार इंग्लंडचा माजी दिग्गज क्रिकेटपटू केविन पीटरसनच्या 'द स्विच' (The Switch) या प्रसिद्ध यूट्यूब चॅनलच्या ताज्या एपिसोडमध्ये पाहायला मिळाला.

२५ मे रोजी अपलोड झालेल्या या एपिसोडने सोशल मीडियावर रिलीज होताच धुमाकूळ घातला आहे. या शोमध्ये पीटरसनने वैभवला ५० चेंडूंमध्ये शतक ठोकण्याचे आव्हान दिले होते, परंतु फॉर्ममध्ये असलेल्या वैभवने केवळ २५ चेंडूंतच हे आव्हान फत्ते करत सर्वांना थक्क केले.

अवघ्या ३ चेंडूंच्या फरकाने श्रेयस अय्यरचा विक्रम अबाधित

या विशेष आव्हानादरम्यान वैभव सूर्यवंशीने मैदानात चौकार-षटकारांची आतिशबाजी करत २५ चेंडूंत आपले झंझावाती शतक पूर्ण केले. मात्र, या दिमाखदार खेळीनंतरही त्याला श्रेयस अय्यरचा एक मोठा विक्रम मोडता आला नाही.

केविन पीटरसनच्या या शोमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरच्या नावावर आहे, ज्याने अवघ्या २२ चेंडूंमध्ये शतकी धावसंख्या गाठली होती. वैभवला अय्यरचा हा विक्रम मोडण्यासाठी केवळ ३ चेंडू कमी पडले. विशेष म्हणजे, डावाच्या सुरुवातीला पीटरसनने विचारले असता, आपण श्रेयसचा रेकॉर्ड मोडणार असा विश्वास वैभवने व्यक्त केला होता, पण त्याला यश आले नाही.

जागतिक दिग्गजांना टाकले मागे

श्रेयस अय्यरचा विक्रम मोडता आला नसला, तरी पीटरसनच्या शोमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वैभव सूर्यवंशीने मानाचे दुसरे स्थान पटकावले आहे. त्याने ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्ससारख्या आंतरराष्ट्रीय टी-२० दिग्गजांना या बाबतीत मागे टाकले आहे. या यादीत वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज निकोलस पूरन २८ चेंडूंसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा 'मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सने ३० चेंडूंत आणि भारताच्या यशस्वी जयस्वालने ४७ चेंडूंत शतक झळकावले होते.

केविन पीटरसनचे गुगली प्रश्न आणि वैभवची चौफेर उत्तरे

फलंदाजी करत असतानाच केविन पीटरसनने वैभवची एक रंजक मुलाखतही घेतली, ज्यामध्ये त्याने वैभवला काही मजेशीर प्रश्न विचारले. 'तुला प्रथम फलंदाजी करायला आवडते की धावांचा पाठलाग (Run Chase) करायला?' असे विचारले असता, वैभवने 'मला दोन्ही गोष्टी सारख्याच आवडतात' असे आत्मविश्वासाने उत्तर दिले. त्यानंतर ९० धावांवर खेळत असताना मनात काय चाललेले असते, या प्रश्नावर तो म्हणाला, "माझा फोकस फक्त माझा नैसर्गिक खेळ (Natural Game) खेळण्यावर असतो, मी दडपण घेत नाही."

एकाच सामन्यात ठोकल्या होत्या तब्बल ३५३ धावा!

संवादादरम्यान पीटरसनने वैभवला त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या खेळीबद्दल विचारले. यावर उत्तर देताना वैभवने आपल्या एका देशांतर्गत (Domestic) सामन्यातील महाविक्रमाची आठवण करून दिली. त्या सामन्यात त्याने संपूर्ण ५० षटके फलंदाजी केली होती आणि एकट्याने तब्बल ३५३ धावांची ऐतिहासिक खेळी उभारली होती, हे ऐकून पीटरसनही अवाक झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोवळ्या वयात मातृत्वाचं ओझं! अल्पवयीन विद्यार्थिनीची जिल्हा रुग्णालयात प्रसूती, पोलिसांकडून पोक्सो कायद्यानुसार तपास सुरू

Mollem: मोले चेकपोस्ट लाच प्रकरणाची चौकशी सुरू, व्हिडिओची दखल ; दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आमोणेत भरधाव 'बोलेरो'! अपघात टळला, मद्यधुंद चालकास दुसऱ्या दिवशी अटक

Mormugao: मुरगाव नगरपालिकेचे स्वच्छता सर्वेक्षण पूर्ण, 25 प्रभागांचे मूल्यांकन, सर्वेक्षकांकडून स्वच्छतागृहाची तपासणी

VIDEO: घरात शिरला चक्क 16 फुटी किंग कोब्रा! असोडे-सत्तरी येथे घरात शिरलेल्या महाकाय सापाला प्राणिमित्राकडून जीवदान

SCROLL FOR NEXT