VIDEO: 'लग्नापूर्वी मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये, मी बायसेक्शुअल आहे", 'लॉक अप 2'मध्ये आकांक्षा चमोलाचा मोठा खुलासा

Lock Upp 2 Akanksha Chamola: नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'लॉक अप 2' मध्ये स्पर्धकांकडून वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे समोर येत आहेत.
Akanksha Chamola
Akanksha ChamolaDainik Gomantak
Published on
Updated on

नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'लॉक अप 2' मध्ये स्पर्धकांकडून वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे समोर येत आहेत. अभिनेत्री आकांक्षा चमोला हिने याआधी तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत बोलून प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. आता शोच्या ताज्या भागात तिने स्वतःच्या लैंगिक ओळखीबाबत खुलासा करत, "मी बायसेक्शुअल आहे", अशी कबुली दिली. तिच्या या वक्तव्यानंतर शोमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले असून सोशल मीडियावरही या विषयाची मोठी चर्चा सुरू आहे.

शोमध्ये उघड झाला वैयक्तिक सीक्रेट

अलीकडील भागात एका स्पर्धकाने आकांक्षाशी संबंधित एक गुपित उघड केल्यानंतर सूत्रसंचालकांनी याबाबत तिला थेट प्रश्न विचारला. त्यावर आकांक्षाने कोणताही आडपडदा न ठेवता ती बायसेक्शुअल असल्याचे स्वीकारले. हा तिच्या आयुष्यातील अत्यंत वैयक्तिक विषय असल्याचे सांगताना ती भावूक झाली.

Akanksha Chamola
Goa politics: विरोधी पक्षांसोबत युतीसाठी 'आप' तयार, स्‍थानिक पदाधिकाऱ्यांना केंद्रीय समितीची मंजुरी; केजरीवालांच स्पष्टीकरण

"लग्नापूर्वी मुलींकडेही आकर्षण वाटायचं"

संवादादरम्यान आकांक्षा म्हणाली की, लग्नापूर्वी तिला काही मुलींबद्दल आकर्षण वाटले होते. तिने स्पष्ट केले की, तिच्यासाठी हा केवळ एखादा टॅग नसून भावना आणि प्रेमाचा विषय आहे. मुलींसोबत तिला सुरक्षित आणि मोकळेपणाने वागता येत असल्याची जाणीवही तिने व्यक्त केली.

सहकलाकारांचा दिलासा

हा खुलासा करताना आकांक्षा भावूक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले. त्यावेळी शोमधील उपस्थितांनी तिचे सांत्वन केले. सूत्रसंचालकांनीही तिला धीर देत तिच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. आकांक्षा म्हणाली की, शोच्या सुरुवातीपासूनच तिच्या आयुष्यातील अनेक वैयक्तिक गोष्टी समोर येत आहेत आणि त्यामुळे ती भावनिकदृष्ट्या अस्वस्थ झाली आहे.

Akanksha Chamola
Goa Housing Society: सोसायटीतील भांडणं, तक्रारी आणि वादांना मिळणार पूर्णविराम! सरकार स्थापन करणार 'सहारा' प्राधिकरण

सोशल मीडियावर चर्चांना उधाण

आकांक्षा चमोलाच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी तिच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले, तर काहींनी तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनावश्यक चर्चा टाळण्याचे आवाहन केले. दरम्यान, या प्रकरणावर तिचे पती अभिनेता गौरव खन्ना यांनी अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही.

आकांक्षा चमोलाचा हा खुलासा 'लॉक अप 2'मधील आतापर्यंतच्या सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या क्षणांपैकी एक ठरत असून, पुढील भागांमध्ये या विषयावर आणखी चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com