Goa Congress: ...तर गिरीश चोडणकर यांनाच हटवा! काँग्रेसला खंबीर नेतृत्वाची गरज- राधाराव ग्रासियस

Radharao Gracias: गोवा काँग्रेस पार्टी नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत, असे मी वृत्तपत्रातून वाचले आहे.
Radharao Gracias
Goa CongressDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: गिरीश चोडणकर यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष केल्यामुळे जर काँग्रेस पक्षात फूट पडत असेल तर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्याची दखल घेत चोडणकर यांना त्या पदावरून हटवण्यात येणे हेच योग्य ठरेल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राधाराव ग्रासियस यांनी व्यक्त केली.

गोवा काँग्रेस पार्टी नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत, असे मी वृत्तपत्रातून वाचले आहे. हा पक्ष कोण स्थापन करत आहे याची मला कोणतीही माहिती नाही. मात्र, हे सारे गोव्यातील काँग्रेसची सूत्रे चोडणकर यांच्या हातात गेल्यानेच होत आहे असेच वाटते, असे ते म्हणाले.

Radharao Gracias
Parliament Monsoon Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून; मतदारसंघ फेररचना विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता

वास्तविक भाजप सरकारला गोव्यातील जनता विटलेली आहे. अशावेळी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणून हे सरकार पाडण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेईल, असे वाटले होते. मात्र, प्रत्यक्षात काँग्रेस पक्षातच जे काय चालले आहे ते बरोबर नाही. काँग्रेस आधी केलेल्या चुकांतून धडा घेऊ पाहत नाही, असे ग्रासियस म्हणाले.

तामिळनाडू येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत चोडणकर यांनी पैसे घेऊन उमेदवाऱ्या विकल्या, असा आरोप त्यांचे नाव घेऊन झाला होता. अशा परिस्थितीत त्यांची चौकशी होण्याऐवजी त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची बक्षीसी दिली गेली आहे. हे सर्व पाहता गोव्यातील निवडणुकीतही उमेदवारांकडून पैशांच्या सुटकेशी घेण्यासाठीच चोडणकर यांना दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पाठवले तर नाही ना, अशी शंका आता लोक घेऊ लागले आहेत, असे ॲड. ग्रासियस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa election 2027 AAP Congress
Goa Politics
Girish Chodankar Congress Alliance
 Girish Chodankar Petition
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com