Goa Milk Price Hike: गोवा डेअरीचे दूध 2 रुपयांनी महागले! सोमवारपासून नवीन दर लागू , जनतेला महागाईचा फटका

Goa Dairy milk price hike: ‘अमूल’कडून दूध दरवाढ झाल्यानंतर आता गोव्‍यातील सर्वांत मोठी दूधउत्पादक संघटना असलेल्या ‘गोवा डेअरी’नेही दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ जाहीर केली आहे.
Goa Dairy milk price hike
Goa Dairy milk price hikeDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: ‘अमूल’कडून दूध दरवाढ झाल्यानंतर आता गोव्‍यातील सर्वांत मोठी दूधउत्पादक संघटना असलेल्या ‘गोवा डेअरी’नेही दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ जाहीर केली आहे. उद्या सोमवारी २५ तारखेपासून ही नवीन दरवाढ लागू होणार असून ग्राहकांना महागाईचा आणखी फटका बसणार आहे. गोवा डेअरीने हायफॅट दूध वगळता इतर सर्व प्रकारच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ केली आहे. शिवाय फ्लेवर्ड दुधाच्या दरातही १ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

यापूर्वी २१ जानेवारी २०२३ रोजी गोवा डेअरीने दुधाच्या प्रकारानुसार प्रतिलिटर ४ ते ५ रुपयांनी दरवाढ केली होती. त्यानंतर दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी गोवा डेअरीने दूध उत्पादकांनाही दरवाढ दिली होती. त्यानंतर डेअरीच्या त्रिसदस्यीय समितीने उत्पादन खर्च, बाजारस्थिती आणि दूध संकलनाचा आढावा घेत नवीन दरवाढीचा प्रस्ताव तयार केला होता.

Goa Dairy milk price hike
Goa Dairy Subsidy: दूध उत्पादक आक्रमक! मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू; उत्तर गोवा शेतकरी संघटनेचा सरकारला थेट इशारा

हा प्रस्ताव सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. सरकारची मान्यता मिळाल्यानंतर आता उद्या सोमवारपासून सुधारित दर लागू करण्यात येणार आहेत.

 एसटीडी दूध (अर्धा लिटर) : ३० रुपये

 गाईचे दूध (अर्धा लिटर) : २८ रुपये

 टोन्ड दूध (१ लिटर) : ५३ रुपये

फ्लेवर्ड दूध (२०० मिली) : २० रुपये

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com