Vaibhav Sooryavanshi  Dainik Gomantak
क्रीडा

Vaibhav Sooryavanshi Double Century: 28 षटकार, 53 चेंडू अन् 204 धावा! 15 वर्षीय 'वैभव'चा ऐतिहासिक धमाका, झळकावले सर्वात वेगवान द्विशतक; वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय

Vaibhav Sooryavanshi Double Century: टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीने वनडे क्रिकेटच्या इतिहासात अकल्पनीय आणि जवळपास अशक्यप्राय वाटणारा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.

Manish Jadhav

Vaibhav Sooryavanshi Double Century: टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीने वनडे क्रिकेटच्या इतिहासात अकल्पनीय आणि जवळपास अशक्यप्राय वाटणारा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. यूएईविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने अवघ्या 52 चेंडूंमध्ये द्विशतक झळकावत वनडेत सर्वात जलद द्विशतक ठोकण्याचा पराक्रम केला. या ऐतिहासिक सामन्यात वैभवने 53 चेंडूंचा सामना करत तब्बल 204 धावांची वादळी खेळी खेळली. सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत त्याने केवळ 28 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले, तर 40 चेंडूंमध्ये दीडशे धावांचा टप्पा गाठत वनडेत सर्वात वेगवान शतक आणि सर्वात जलद दीडशे धावांचेही नवे विक्रम रचले.

या विक्रमी खेळीदरम्यान वैभवने 28 षटकार ठोकले, ज्यामुळे एका डावात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज ठरण्याचा मानही त्याने मिळवला. यापूर्वी न्यूझीलंडच्या चॅड बोएसने 103 चेंडूंमध्ये द्विशतक झळकावले होते, मात्र वैभवने निम्म्याहून कमी चेंडूंमध्ये हा टप्पा गाठून तो विश्वविक्रम सहज मोडीत काढला. याशिवाय प्रोफेशनल क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकारांचा तन्मय अग्रवालचा 26 षटकारांचा विक्रम तसेच 2018 मध्ये डार्सी शॉर्टने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये लगावलेले 23 षटकारही या पंधरा वर्षीय फलंदाजाने मागे टाकले.

अल्पवयातच गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत वैभव सूर्यवंशीने क्रिकेटविश्वात खळबळ उडवून दिली. इतक्या कमी चेंडूंमध्ये द्विशतक आणि षटकारांची अशी विक्रमी बरसात पाहून आगामी काळात वैभव अनेक मोठे टप्पे पार करेल, अशी चर्चा क्रीडा वर्तुळात रंगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Surya Gochar 2026: वर्ष संपण्यापूर्वी 'या' 5 राशींची चांदी! सूर्य गोचरने बदलणार दिवस; होणार मोठा धनलाभ

Pakistan Sindh Protest: कराचीच्या रस्त्यांवर 'सिंधुदेश'चे नारे! असीम मुनीरच्या विरुद्ध उसळला जनक्षोभ; पाकिस्तानच्या विभाजनाची चाहूल?

Satish Timbale Trophy: बंद पडलेल्या शालेय क्रिकेटला पणजी जिमखान्याची संजीवनी; 16 वर्षांखालील 8 संघ भिडणार

Sheikh Hasina: 'हातकड्या घालूनच परत आणू...', शेख हसीना यांच्या घरवापसीवर बांगलादेशी परराष्ट्र मंत्र्यांची धमकी; 16 डिसेंबरचा प्लॅन फसणार

Indian Football League: धेंपो क्लबला काश्मीरमध्ये 3-1 ने धक्का; रियल काश्मीरने उघडले विजयाचे खाते

SCROLL FOR NEXT