Hockey India Sub Junior National
Hockey India Sub Junior National Dainik Gomantak
क्रीडा

सबज्युनियर हॉकीत उत्तर प्रदेशची झारखंडवर मात; गतविजेत्यांना धक्का

किशोर पेटकर

Hockey India Sub Junior National : उत्तर प्रदेशने गतविजेत्या झारखंडवर 3-0 फरकाने सफाईदार विजय नोंदवत हॉकी इंडियाच्या बाराव्या राष्ट्रीय सबज्युनियर मुलांच्या हॉकी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. तीन शानदार मैदानी गोल करणारा शाहरुख अली विजयाचा शिल्पकार ठरला. (Uttar Pradesh Team Won in Hockey India Sub Junior Nationals)

अंतिम सामना रविवारी पेडे-म्हापसा येथील ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदानावर झाला. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत ओडिशाने हरियानावर 5-2 फरकाने मात केली. ओडिशासाठी आय. रोहित सिंगने दोन गोल केले. त्याने स्पर्धेत सर्वाधिक 12 गोल करण्याचा मान मिळविला. याशिवाय आर्यन शेस, रिकी टोंजाम, संजित तिर्की यांनी प्रत्येकी एक गोल केला. हरियानातर्फे रवी व बिट्टू यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.

शाहरुखच्या दोन गोलमुळे सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये उत्तर प्रदेशने दोन गोलची मजबूत आघाडी मिळविली. त्याने अनुक्रमे 10 व 13व्या मिनिटास गोल केला. नंतर चौथ्या क्वार्टरमध्ये 47व्या मिनिटास शाहरुखने आणखी एक गोल नोंदवून उत्तर प्रदेशच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

विजेते प्रशिक्षक आनंदित

‘‘अंतिम लढतीत झारखंडसारख्या बलाढ्य संघाला नमविणे ही अनोखी भावना आहे. खेळाडू, प्रशिक्षक आणि संपूर्ण उत्तर प्रदेश हॉकीसाठी ही मोठी उपलब्धी आहे,’’ अशी प्रतिक्रिया अत्यानंदित झालेले उत्तर प्रदेशचे प्रशिक्षक विकास पाल यांनी दिली. उपांत्य फेरीत हरियानास नमविल्यानंतर आमच्या संघाचा आत्मविश्वास उंचावला आणि त्याचा फायदा अंतिम लढतीत झाला, त्यामुळे 16 वर्षांखालील वयोगटातील सारे खेळाडू प्रेरित झाले. कारकिर्दीत त्यांना मोठी झेप घेण्याचे आत्मबल या विजेतेपदाने प्राप्त झाल्याचे मत विकास यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute ODP: कळंगुट ओडीपी खटला लांबणीवर; सुनावणीसाठी तयार नसल्याने सरकारवर ओढावली नामुष्की

Goa Rain Update: गोव्यात 'यलो अलर्ट': पणजीत सर्वाधिक तापमानाची नोंद

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा प्रवासासाठी आता तीन पर्याय; महाराष्ट्र सरकारकडून आणखी दोन महामार्गांचा प्रस्ताव

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर मद्यपींचा धिंगाणा; टॅक्सीचालकाला मारहाण

Goa Crime News: पेडण्यात टॅक्सीचालकांनी आणले कोनाडकरांचे खून प्रकरण उघडकीस

SCROLL FOR NEXT