जगभरातील 'या' पाच क्रिकेटपटूंचा रस्ते अपघातात झाला मृत्यू

जगभरातील अनेकक्रिकेटपटूंचा रस्ते मृत्यू अपघातात झाला आहे त्यापैकी निवडक पाच
Andrew Symonds
Andrew SymondsDainik Gomantak
Published on
Andrew Symonds
Andrew SymondsDainik Gomantak

अँड्र्यू सायमंड्स

ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. सायमंड्सचं वयाच्या 46 व्या वर्षी निधन झालं आहे. केवळ सायमंड्स नव्हे तर त्याच्यापूर्वी असे 5 क्रिकेटपटू आहेत ज्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.

Collie Smith
Collie SmithDainik Gomantak

कोली स्मिथ

वेस्ट इंडीजचे माजी अष्टपैलू कोली स्मिथ यांचे 9 सप्टेंबर 1959 रोजी इंग्लंडमध्ये झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले होते.रस्त्यावरून कार वेगात जात असताना पहाटे 4.45 वाजता गुरांचा ट्रक खुप वेगाने आला आणि ज्यामुळे हा अपघात घडला. स्मिथ यांनी 26 कसोटी सामन्यात 31.70 च्या सरासरीने 1.331 धावा आणि 48 गडी बाद केले होते.

Dhruva Pandove
Dhruva PandoveDainik Gomantak

ध्रुव पंडोव

भारताचा क्रिकेटपटू ध्रुव पंडोव याचाही कार अपघातात मृत्यू झाला होता. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही मात्र पंजाबकडून खेळला होता. 1992 साली त्याचा वयाच्या 18 व्या वर्षी कार अपघात झाला होता. अंबाला जवळील रस्त्यावर त्याचा हा अपघात झाला होता.

Runako Morton
Runako MortonDainik Gomantak

रुनाको मोर्टन

वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू रुनाको मोर्टन याचाही अपघातामध्ये मृत्यू झाला होता. गाडी त्रिनिदादमधीस सोलमॉन हायवेवरील एका पोलवर धडकली होती. हा अपघात 2012 साली झाला होता. त्यावेळी तो केवळ 33 वर्षांचा होता. त्याने 15 कसोटी सामने, 56 वनडे आणि 7 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळले होते.

Ben Hollioake
Ben HollioakeDainik Gomantak

बेन हॉलिओक

इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन हॉलिओक याचा 2002 मध्ये कार अपघातात मृत्यू झाला होता.केवळ 24 व्या वर्षी त्याच्या कारचा अपघात झाला. पर्थमध्ये कार चालवत असताना, त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार भिंतीला धडकली होती. त्याने इंग्लंड संघासाठी 20 वनडे आणि 2 कसोटी सामने खेळले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com