KL Rahul X/BCCI
क्रीडा

IND vs ENG: पाचव्या कसोटीतही केएल राहुलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह! परदेशात घेतोय उपचार?

KL Rahul Injury: केएल राहुल मांडीच्या दुखापतीमुळे सध्या भारतीय संघातून बाहेर असून आता इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीतही त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.

Pranali Kodre

Uncertainty Over KL Rahul's availability for India vs England 5th Test in Dharamsala:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचवा सामना धरमशाला येथे 7 मार्चपासून खेळवला जाणार आहे. दरम्यान, या सामन्यासाठी केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांची उपलब्धता चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, जसप्रीत बुमराहला या मालिकेतील चौथ्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. तो सातत्याने खेळत असल्याने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण पाचव्या सामन्यासाठी तो पुनरागमन करण्याच दाट शक्यता आहे.

तथापि, केएल राहुलबाबत मात्र अद्यापही साशंकता आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार केएल राहुलला तज्ञांचा सल्ला घेण्यासाठी परदेशात पाठवण्यात आले आहे. कारण त्याला अद्यापही उजव्या मांडीमध्ये समस्या जाणवत आहे.

दरम्यान, तो लंडनमध्ये तज्ञांचा सल्ला घेत असल्याची शक्यता आहे, पण याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

खरंतर केएल राहुल इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळला होता. मात्र, त्यानंतर त्याच्या मांडीमध्ये ताण आल्याने तो दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यालाही मुकला.

दरम्यान, तिसऱ्या समन्यापूर्वी तो 90 टक्के तंदुरुस्त असल्याचे बीसीसीआयने सांगितले होते. परंतु, आता त्याला त्याच्या मांडीच्या दुखापतीवर सल्ला घेण्यासाठी परदेशात पाठवण्यात आल्याचे समजत आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की केएल राहुलच्या उजव्या मांडीवर गेल्याचवर्षी मे महिन्यात युकेमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्याला ही दुखापत अद्यापही त्रास देत असल्याचे दिसून आले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार ज्यांना याबद्दल माहिती आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार त्याची दुखापत सध्या गंभीर नाही. परंतु, तो वनडे आणि कसोटी संघातील प्रमुख खेळाडूंपैकी असल्याने त्याच्याबाबत जोखीम घेण्याची फिजिओ आणि संघव्यवस्थापनाची इच्छा नाही.

आता परदेशातील तज्ञांच्या रिपोर्टवर आणि केएल राहुल परत येण्यावर त्याची पाचव्या सामन्यातील उपलब्धता समजणार आहे.

जर केएल राहुल पूर्ण तंदुरुस्त असेल, तर तो धरमशालामध्ये खेळताना दिसू शकतो. जर तो पुनरागमन करणार असेल, तर रजत पाटीदारला त्याच्यासाठी प्लेइंग इलेव्हनमधील जागा रिकामी करावी लागेल. दरम्यान, जरी केएल राहुल पाचवा कसोटी सामना खेळला नाही, तरी तो आगामी आयपीएल 2024 स्पर्धेत खेळताना दिसू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT