U19 South Africa vs U19 India X/BCCI
क्रीडा

IND-U19 vs SA-U19: फायनलमध्ये पावसाचा अडथळा! भारत-द. आफ्रिका युवा संघ तिरंगी मालिकेचे संयुक्त विजेते

U19 Tri-Nations Series: भारत आणि दक्षिण आफ्रिका युवा संघांना 19 वर्षांखालील तिरंगी मालिकेचे संयुक्तरित्या विजेतेपद देण्यात आले.

Pranali Kodre

U19 Tri-Nations Series Trophy shared between India and South Africa :

भारताचा 19 वर्षांखालील मुलांचा संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 19 वर्षांखालील वर्ल्डकप खेळणार आहे. पण त्याआधी या दौऱ्यात भारतीय संघ 19 वर्षांखालील दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान संघाविरुद्ध तिरंगी मालिका खेळत होता. या तिंरगी मालिकेत भारत आणि दक्षिण आफ्रिका युवा संघाने संयुक्तरित्या विजेतेपद जिंकले.

गुरुवारी (10 जानेवारी) भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात जोहान्सबर्गला अंतिम सामना होणार होता. मात्र, गुरुवारी जोहान्सबर्गमध्ये पावसाचा अडथळा आला. पावसामुळे या अंतिम सामन्यात एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे अखेरीस दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले.

या तिंरगी मालिकेत भारताने साखळी फेरीतील अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघांविरुद्धचे प्रत्येकी दोन दोन सामने जिंकून अंतिम फेरीतील स्थान पक्के केले होते. तसेच दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानने प्रत्येकी एक सामना जिंकला होता. मात्र दक्षिण आफ्रिकेने नेट रनरेटच्या जोरावर अंतिम सामना गाठला होता.

दरम्यान, ही मालिका आगामी 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाची होती. दक्षिण आफ्रिकेत 19 जानेवारीपासून 19 वर्षांखालील वनडे वर्ल्डकप स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत भारताचे नेतृत्व उदय सहारन करणार आहे.

19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेत 20 संघ सहभागी झाले असून या 20 संघांना चार-चारच्या पाच गटात साखळी फेरीसाठी विभागण्यात आले आहे. भारताचा समावेश बांगलादेश, आयर्लंड आणि अमेरिका या देशांच्या 19 वर्षांखालील संघासह ए गटात करण्यात आला आहे.

19 वर्षांखालील वर्ल्डकपसाठी असा आहे भारतीय संघ -

आर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयुर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेल्ली अविनाश राव (यष्टीरक्षक), सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार), मुरुगन अभिषेक, इन्नेश महाजन (यष्टीरक्षक), धनुष गावडा, आराध्य शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT