U19 Men's Asia Cup 2023 Captains X/ACCMedia1
क्रीडा

U19 Asia Cup: 8 डिसेंबरपासून यंगिस्तान लढण्यास सज्ज! भारत-पाकिस्तानही येणार आमने-सामने, पाहा वेळापत्रक

Pranali Kodre

U19 Men's Asia Cup 2023 Cricket Schedule:

शुक्रवारपासून (8 डिसेंबर) 19 वर्षांखालील पुरुष आशिया चषक 2023 स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी आता सर्व संघ सज्ज आहे. या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, युएई आणि जपान यांचा समावेश आहे.

ही स्पर्धा दुबईमध्ये होणार असून 17 डिसेंबर रोजी अंतिम सामना होईल. म्हणजेच 10 दिवस युवा संघातील हा थरार चालणार आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान युवा संघातील सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होईल.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या 8 संघांची साखळी फेरीसाठी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. साखळी फेरीत ए ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे चार संघ आहेत, तर बी ग्रुपमध्ये बांगलादेश, श्रीलंका, युएई आणि जपान यांचा समावेश आहे.

साखळी फेरी शुक्रवारी सुरू होईल, तर बुधवारी (13 डिसेंबर) संपेल. त्यानंतर दोन्ही ग्रुपमधून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरीतील दोन्ही सामने 15 डिसेंबर रोजी पार पडतील. त्यानंतर रविवारी (17 डिसेंबर) अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होईल.

साखळी सामने दुबईतील आयसीसीच्या ऍकेडमीच्या विविध मैदानांमध्ये होणार आहेत. त्याचबरोबर उपांत्य फेरीतील एक सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आणि दुसरा सामना आयसीसी ऍकेडमी ओव्हल-1 या मैदानात होईल. 

19 वर्षांखालील पुरुष आशिया चषक 2023 स्पर्धेतील सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 11 वाजता चालू होणार आहेत.

भारत सर्वात यशस्वी संघ

या स्पर्धेत भारताचा 8 डिसेंबरनंतर 10 डिसेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध साखळी सामना होणार आहे, तर 12 डिसेंबर रोजी नेपाळविरुद्ध साखळी सामना होईल.

भारतीय संघ या स्पर्धेचा सर्वात यशस्वी संघ आहे. भारतीय युवा पुरुष संघाने ही स्पर्धा तब्बल 8 वेळा जिंकली आहे. त्यामुळे यंदा नवव्यांदा या स्पर्धेची ट्रॉफी उंचावण्यास भारताचे यंगिस्तान उत्सुक असतील.

19 वर्षांखालील पुरुष आशिया चषक 2023 स्पर्धेचे वेळापत्रक (वेळ - स. 11 वाजता)

8 डिसेंबर -

  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान, (आयसीसी ऍकेडमी ओव्हल - 1)

  • पाकिस्तान विरुद्ध नेपाळ, (आयसीसी ऍकेडमी ओव्हल - 2)

9 डिसेंबर

  • बांगलादेश विरुद्ध युएई, (आयसीसी ऍकेडमी ओव्हल - 1)

  • श्रीलंका विरुद्ध जपान, (आयसीसी ऍकेडमी ओव्हल - 2)

10 डिसेंबर

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (आयसीसी ऍकेडमी ओव्हल - 1)

  • अफगाणिस्तान विरुद्ध नेपाळ (आयसीसी ऍकेडमी ओव्हल - 2)

11 डिसेंबर

  • श्रीलंका विरुद्ध युएई (आयसीसी ऍकेडमी ओव्हल - 1)

  • बांगलादेश विरुद्ध जपान (आयसीसी ऍकेडमी ओव्हल - 2)

12 डिसेंबर

  • पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (आयसीसी ऍकेडमी ओव्हल - 1)

  • भारत विरुद्ध नेपाळ (आयसीसी ऍकेडमी ओव्हल - 2)

13 डिसेंबर

  • बांगलादेश विरुद्ध श्रीलंका (आयसीसी ऍकेडमी ओव्हल - 1)

  • युएई विरुद्ध जपान (आयसीसी ऍकेडमी ओव्हल - 2)

15 डिसेंबर

  • पहिला उपांत्य सामना (दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम)

  • दुसरा उपांत्य सामना (आयसीसी ऍकेडमी ओव्हल - 1)

17 डिसेंबर

  • अंतिम सामना (दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT