U19 Asia Cup: भारतीय संघाची घोषणा! पंजाबच्या खेळाडूकडे कॅप्टन्सी; 'या' दिवशी रंगणार पाकिस्तान विरुद्ध थरार

India U19 Team: बीसीसीआयने 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेसाठी 15 खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय संघाची घोषणा केली आहे.
Uday Saharan | U19 Team India
Uday Saharan | U19 Team India Instagram

BCCI announced India squad for ACC Men’s U19 Asia Cup:

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये वरिष्ठ संघांची आशिया चषक स्पर्धा खेळवण्यात आली होती, आता 19 वर्षांखालील पुरुष क्रिकेट संघाची आशिया चषक स्पर्धा 8 डिसेंबरपासून सुरु होत आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे.

आगामी 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेसाठी भारताच्या ज्युनियर क्रिकेट कमिटीने संघनिवड केली आहे. भारताच्या या संघात 15 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तसेच 7 राखीव खेळाडूंचीही निवड करण्यात आली असून त्यातील तीन खेळाडू संघाबरोबर प्रवास करतील. अन्य चार खेळाडू संघाबरोबर प्रवास करणार नाहीत.

पंजाबकडून खेळणाऱ्या उदय सहारनकडे भारताच्या या युवा संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तसेच मध्यप्रदेशच्या सौमी कुमार पांडेकडे उप-कर्णधारपदाची जबाबदारी असेल.

Uday Saharan | U19 Team India
Asia Cup 2023: नटखट इशानने केली विराटची नक्कल, मग किंग कोहलीनंही दिली भन्नाट रिऍक्शन, पाहा Video

साखळी सामने आणि बाद फेरी

या स्पर्धेत साखळी फेरीत भारताचा समावेश ए ग्रुपमध्ये करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे चार संघ आहेत, तर बी ग्रुपमध्ये बांगलादेश, श्रीलंका, युएई आणि जपान यांचा समावेश आहे.

या स्पर्धेतील साखळी सामने 8 डिसेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान रंगणार आहेत. त्यानंतर दोन्ही ग्रुपमधून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरी 15 डिसेंबर रोजी पार पडेल. यानंतर 17 डिसेंबर रोजी अंतिम सामना होईल. हे सर्व सामने दुबईला होणार आहेत.

साखळी सामने दुबईतील आयसीसीच्या ऍकेडमी मैदानांमध्ये होणार आहेत, तर उपांत्य फेरीतील पहिला सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आणि दुसरा सामना आयसीसी ऍकेडमी ओव्हल-1 या मैदानात होईल. त्याचबरोबर अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होईल. तसेच सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार 11 वाजता चालू होणार आहेत.

Uday Saharan | U19 Team India
Asia Cup 2023 Prize Money: आशिया कप जिंकून टीम इंडिया बनली मालमाल, श्रीलंकेवरही पैशांचा पाऊस; जाणून घ्या किती मिळाली रक्कम!

भारताचे साखळी सामने

या स्पर्धेत साखळी फेरीत भारताचा पहिला सामना 8 डिसेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार आहे, तर 10 डिसेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध सामना होईल. त्यानंतर 12 डिसेंबर रोजी नेपाळविरुद्ध सामना होणार आहे.

युवा भारतीय संघ या स्पर्धेचा गतविजेता असून सर्वात यशस्वी संघही आहे. युवा भारतीय संघाने तब्बल आठ वेळा 19 वर्षांखालील आशिया चषक उंचावला आहे.

19 वर्षांखालील आशिया चषकासाठी भारतीय संघ -

आर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयुर पटेल, सचिन धास, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेली अविनाश राव (यष्टीरक्षक), सौमी कुमार पांडे (उप-कर्णधार), मुरुगन अभिषेक, इन्नेश महाजन (यष्टीरक्षक), धनुश गावडा, आराध्य शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.

  • संघाबरोबर प्रवास करणारे राखीव खेळाडू - प्रेम देवकर, अंश गोसाई, मोहम्मद अमन

  • संघाबरोबर प्रवास न करणारे राखीव खेळाडू - दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी विग्नेश, किरण चोरमले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com