Asia Cup 2023 Prize Money: आशिया कप जिंकून टीम इंडिया बनली मालमाल, श्रीलंकेवरही पैशांचा पाऊस; जाणून घ्या किती मिळाली रक्कम!
Asia Cup 2023 Prize Money: आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. टीम इंडियाने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करुन मोठा विजय तर नोंदवलाच, पण आशिया चषक स्पर्धेतील आठवे विजेतेपदही पटकावले.
टीम इंडियाचे खेळाडू यावेळी शानदार विजयाचा आनंद साजरा करताना दिसले. सर्व खेळाडूंनी ट्रॉफीसोबत फोटो काढून आनंद साजरा केला.
या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर पैशांचा पाऊस पडला आहे. तर श्रीलंकेच्या संघालाही मोठी रक्कम मिळाली.
टीम इंडियाला 1.24 कोटी रुपये मिळाले
आशिया कप ट्रॉफी व्यतिरिक्त आशिया कपमध्ये चॅम्पियन बनलेल्या टीम इंडियाला (Team India) 1.50 लाख डॉलर्स म्हणजेच अंदाजे 1.24 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर उपविजेता म्हणून श्रीलंकेच्या संघाला 75 हजार डॉलर्स म्हणजेच अंदाजे 62.31 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
तर मोहम्मद सिराजला सामनावीर म्हणून 5 हजार डॉलर (जवळपास 4.15 लाख रुपये) देण्यात आले. कुलदीप यादवला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून 15 हजार डॉलर्सचा धनादेश देण्यात आला.
भारतीय चलनात ही रक्कम 12.46 लाख रुपये होते. गेल्या वर्षी श्रीलंकेने टी-20 फॉरमॅटमध्ये आशिया कप जिंकला होता. त्याला ट्रॉफीसह बक्षीस म्हणून 1.59 कोटी रुपये मिळाले होते. पाकिस्तानला उपविजेते म्हणून 79 लाख रुपये देण्यात आले.
टीम इंडिया आठव्यांदा चॅम्पियन बनली
टीम इंडियाने आठव्यांदा आशिया कप ट्रॉफीवर कब्जा केला आहे. तो या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने (India) 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023 मध्ये हे विजेतेपद पटकावले आहे.
तर श्रीलंकेने 6 वेळा विजेतेपद पटकावले आहे. 1986, 1997, 2004, 2008, 2014 आणि 2022 मध्ये आशिया कप ट्रॉफी जिंकली. पाकिस्तानने दोन वेळा आशिया कप जिंकला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.