U19 India Women Team Dainik Gomantak
क्रीडा

U19 World Cup Final: हाच तो सुवर्णक्षण! पहिला वर्ल्डकप जिंकताच भारतीय पोरींचा जल्लोष, Video Viral

19 वर्षांखालील वर्ल्डकप जिंकल्यानंतर युवा भारतीय महिला संघाने जोरदार जल्लोष केला.

Pranali Kodre

U19 India Women Team: भारताच्या 19 वर्षांखालील महिला संघाने पहिल्या 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकप जिंकत इतिहास रचला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचा हा आयसीसी स्पर्धेतील पहिले विजेतेपद आहे. रविवारी झालेल्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताने 19 वर्षांखालील इंग्लंडला 7 विकेट्सने पराभूत केले आणि विश्वविजेतेपदावर नाव कोरले आहे.

अंतिम सामन्यात भारतासमोर 69 धावांचे आव्हान होते. हे आव्हान भारतीय महिला संघाने केवळ 14 षटकात पूर्ण केले. भारताकडून सौम्या तिवारीने विजयी धाव घेतली. तिने विजयी धाव घेताच भारतीय संघाच्या गोटात जोरदार जल्लोष झाला.

भारतीय संघाचा जल्लोष

सौम्याने विजयी धाव घेतल्यानंतर तिने मैदानातच आनंद साजरा करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी तिच्याबरोबर दुसऱ्या बाजूने फलंदाजी करण्यासाठी ह्रितिशा बासू होती.

त्यांच्याबरोबर मैदानात अन्य भारतीय खेळाडूही वर्ल्डकप विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मैदानात सामील झाले. यावेळी भारतीय संघाचे कर्णधार शफाली वर्माने यावेळी भारताचा तिरंगाही पाठीवर घेतला होता. या सेलिब्रेशनचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

(U19 India Women Team Celebration after winning U19 Women's T20 World Cup)

भारताचा विश्वविजय

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णय भारतीय फलंदाजांनी योग्य ठरवत इंग्लंडला 17.1 षटकातच 68 धावांवर रोखले. इंग्लंडकडून नियामह हॉलंड (10), रायना मॅकडोनाल्ड गे (19), ऍलेक्सा स्टोनहाऊस (11) आणि सोफिया स्मेल (11) यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली.

मात्र असे असले तरीही इंग्लंडच्या कोणत्याच फलंदाजाला 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. भारताकडून तितास साधू, अर्चना देवी आणि पार्शवी चोप्रा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तसेच शफाली वर्मा, मन्नत कश्यप आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

त्यानंतर 69 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने कर्णधार शफाली वर्मा (15) आणि श्वेता सेहरावत (5) यांच्या विकेट्स झटपट गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर गोंगाडी त्रिशा आणि सौम्या तिवारी यांनी तिसऱ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी रचली आणि भारताचा विजय सोपा केला.

भारताला ३ धावांची गरज असताना त्रिशा 24 धावांवर बाद झाली. पण अखेर 14 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर सौम्याने विजयी धाव काढली. तिनेही नाबाद 24 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून हनाह बेकर, ग्रेस स्क्रिव्हन्स आणि ऍलेक्सा स्टोनहाऊसने यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT