India World Cup U-19 Team Dainik Gomantak
क्रीडा

U 19 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया सामना कधी आणि कुठे रंगणार

पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने अफगाणिस्तानचा 15 धावांनी पराभव करून अंतिम फेरीचे तिकीट आपल्या नावाने केले आहे.

दैनिक गोमन्तक

आयसीसी अंडर-19 विश्वचषक (U 19 World Cup) स्पर्धेतील शानदार सामना आता एका रोमांचक वळणावर आला आहे. मंगळवारी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने अफगाणिस्तानचा 15 धावांनी पराभव करून अंतिम फेरीचे तिकीट आपल्या नावाने केले आहे. आता इंग्लंडच्या संघाने फायनल गाठल्याने वेस्ट इंडीजमध्ये सुरु असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये भारत (India U 19) आणि ऑस्ट्रेलिया (Australia U 19) यांच्यात सामना रंगणार आहे. आणि दुसऱ्या सेमी फायनलमधील विजेता शनिवारी इंग्लंडविरुद्ध फायनल खेळताना दिसणार आहे. (U 19 World Cup India U 19 vs Australia U 19 Super League Semi Final 2)

24 वर्षांनंतर फायनलमध्ये

पावसामुळे हा सामना अंतिम फेरीत 47-47 षटकांचा करण्यात आला. या सामन्यात इंग्लंड आधीच विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात होता, मात्र विरोधी अफगाणिस्तान संघाला जोरदार झुंज दिली. 44 षटकांतच अफगाणिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचून इतिहास घडवेल असे वाटत असताना 24 वर्षात पहिल्यांदाच इंग्लंडने फायनलचे तिकीट कापले.

भारतीय संघानं या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही

या स्पर्धेत भारतीय संघ (India U19 ) ब गटात होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीने युवा टीम इंडियाने स्पर्धेला सुरुवात केली होती. सलामीच्या सामन्यात यश धूल (Yash Dhull) च्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ( India U19 ) 45 धावांनी विजय नोंदवला होता. भारतीय संघाने आयर्लंडचा 174 धावांनी तर युंगाडाचा 326 धावांनी दारुण पराभव केला होता. क्वार्टर फायनलच्या लढतीत टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत करत सेमी फायनलमध्ये एंट्री केला आहे. भारतीय संघानं या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. ही गोष्ट सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला अधिक बळ देणारी ठरली. तर दुसरीकडे दुसरीकडे ड गटात खेळलेल्या ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीज, स्कॉटलंड टिमला पराभूत केले होते. श्रीलंका, पाकिस्तानला पराभूत करत आज ऑस्ट्रेलियाने सेमी फायनल गाठली आहे.

India vs Australia कुठे रंगणार सामना?

भारतीय अंडर 19 संघ आणि ऑस्ट्रेलिया अंडर 19 संघ यांच्यातील दुसरा सेमी फायनल सामना आज सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. हा सामना अँटिगाच्या कॉलिज क्रिकेट ग्राउंडवर (Coolidge Cricket Ground, Antigua) खेळला जाणार आहे.

India vs Australia कुठे पाहता येणार?

हा सामना बघण्यसाठी क्रिकेटप्रेमी फार उत्सुक आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमी फायनल लढत स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. याशिवाय Disney+ Hotstar वरही या सामन्याचा आनंद क्रिकेटप्रमींना घेता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT