Commonwealth Games: भारतीय महिला पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाशी भिडणार

लीगसह नॉकआउट महिला स्पर्धेची सुरुवात 2020 मधील महिला T20 विश्वचषक उपविजेते ऑस्ट्रेलिया आणि भारत (Indian women's cricket team) यांच्यातील सामन्याने होणार आहे.
Commonwealth Games
Commonwealth GamesDainik Gomantak

बर्मिंगहॅममध्ये यंदा होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे 24 वर्षांनंतर क्रिकेट राष्ट्रकुल स्पर्धेत परतणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेचे क्रिकेट वेळापत्रक जाहीर झाले आहे. लीगसह नॉकआउट महिला स्पर्धेची सुरुवात 2020 मधील महिला T20 विश्वचषक उपविजेते ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारत (Indian women's cricket team) यांच्यातील सामन्याने होणार आहे. 7 ऑगस्ट रोजी अंतिम आणि कांस्यपदकाचे सामने होणार आहेत. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समधील (Commonwealth Games) सर्व सहभागींची घोषणा करणारा क्रिकेट हा पहिला खेळ ठरला, ज्यामध्ये महिलांच्या T20 स्पर्धेतील श्रीलंका (Sri Lanka) आठवा संघ असणार आहे. (The First Match Of The Commonwealth Games Will Be Between India And Australia)

दरम्यान, गेल्या आठवड्यात क्वालालंपूरमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पात्रता फेरीत श्रीलंकेच्या विजयानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (International Cricket Council) आणि राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने ही घोषणा केली. ऑस्ट्रेलिया, बार्बाडोस, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि पाकिस्तान (Pakistan) आधीच पात्र ठरले आहेत. 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स खेळवण्यात येणार असून यामध्ये 72 देशांतील 4500 खेळाडू सहभागी होणार आहेत.

Commonwealth Games
IND vs WI: जेसन होल्डर म्हणाला, 'भारताला आम्ही त्यांच्या होम ग्राऊंडवर हरवू'

महिला क्रिकेटला प्रथमच स्थान मिळाले

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रथमच महिला क्रिकेट खेळले जात आहे. यापूर्वी 1998 मध्ये एकदा पुरुष क्रिकेट या खेळांचा भाग होता. त्यावेळी शॉन पोलॉकच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघाने अंतिम फेरीत स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाचा चार गडी राखून पराभव केला होता. त्या खेळांमध्ये सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस आणि महेला जयवर्धने सारखे स्टार्स सहभागी झाले होते.

संघ दोन गटात विभागले

बार्बाडोस, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि भारत अ गटात आहेत तर ब गटात इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका आहेत. 31 जुलैला भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होतील. 3 ऑगस्टला भारतीय महिलांचा सामना बार्बाडोसशी होणार आहे. बार्बाडोस आणि पाकिस्तानचा सामना 29 तारखेलाच होणार आहे. 31 जुलै रोजी ऑस्ट्रेलिया आणि बार्बाडोस आणि त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानची गाठ पडेल.

Commonwealth Games
'बायो बबलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटर्संना अधिक मदतीची गरज': जेसन होल्डर

आयसीसी, सीजीएफ आणि कॉमनवेल्थ गेम्स श्रीलंकेने पात्र ठरल्याबद्दल श्रीलंकेच्या संघाचे अभिनंदन केले आहे. आयसीसीचे मुख्य कार्यकारी ज्योफ अल्लार्डिस म्हणाले, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांची घोषणा करण्यात आली आहे. आठ सर्वोत्तम संघ सुवर्णपदकासाठी खेळणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com