Belgium vs India  www.fih.hockey
क्रीडा

Hockey Junior World Cup: पहिल्याच सामन्यात डझनभर गोल करणाऱ्या भारतीय महिलांचं आव्हान सलग दोन पराभवानंतर संपलं

India Women Hockey Team: भारतीय महिला संघाचे ज्युनियर हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

Pranali Kodre

FIH Hockey Women’s Junior World Cup 2023, Team India knocked out:

चिलीला महिला ज्युनियर हॉकी वर्ल्डकप २०२३ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा साखळी फेरीसाठी सी गटात समावेश आहे. या गटातील भारताचा तिसरा सामना बेल्जियमविरुद्ध पार पडला. सँटिआगो, चिली येथे झालेल्या या सामन्यात बेल्जियमने भारताला 3-2 अशा फरकाने पराभूत केले.

दरम्यान, भारताचा हा सलग दुसरा पराभव ठरला. यापूर्वी दुसऱ्या सामन्यात जर्मनीने भारताला 4-3 अशा फरकाने पराभूत केले होते.

पहिल्या सामन्यात मात्र भारताने कॅनडाविरुद्ध 12-0 असा विजय मिळवलेला. मात्र सलग दोन सामन्यातील पराभवामुळे भारतीय संघ सी गटात तिसऱ्या क्रमांकावर राहिला, त्यामुळे भारताचे उपांत्य पूर्व फेरीत पोहचण्याचे स्वप्न भंगले. आता भारतीय संघ 9 ते 16 क्रमांकांमध्ये स्थान मिळवण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध 5 डिसेंबर रोजी खेळेल.

शनिवारी (2 डिसेंबर) बेल्जियमविरुद्ध झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर भारताकडून अन्नूने भारतासाठी दोन्ही गोल नोंदवले, तर बेल्जियमकडून नोआ श्क्रुअर्स, फ्रान्स दे मॉट आणि अस्त्रिद बोनामी यांनी प्रत्येकी एक गोल केला.

नोआने पहिल्याच क्वार्टरमध्ये पाचव्या मिनिटाला बेल्जियमसाठी पहिला गोल नोंदवला होता. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही, पण तिसऱ्या क्वार्टरमध्ये फ्रान्स दे मॉटने 42 व्या मिनिटाला बेल्जियमला दुसरा गोल करून दिला.

तसेच तिसऱ्या क्वार्टरमध्ये अन्नूने भारताला पुनरागमन करून देण्याचा प्रयत्न केला होता. तिने 47 आणि 51 व्या मिनिटाला गोल नोंदवले आणि भारताला बरोबरी साधून दिली होती. मात्र, बोनामीने 52 व्या मिनिटाला बेल्जियमला तिसरा गोल करून दिला. हा गोल बेल्जियमच्या विजयासाठी महत्त्वाचाही ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; स्वतःला जेम्स बाँड समजणारा पोलिस अधिकारी

Panaji Spa Ban: पणजीत 'स्पा'ना बंदी! अखेर मनपाला आली जाग; नवीन परवानग्या दिल्या जाणार नाहीत

Siolim: वस्तू पळवायला घरात घुसल्या, स्थानिकांनी ठेवले झाडाला बांधून; शिवोलीत 2 परप्रांतीय महिलांना गावकऱ्यांनी घडवली अद्दल

FDA Raid: दिवाळीसाठी मिठाई घेताय? मग काळजी घ्या! गोव्यात ‘एफडीए’कडून अस्वच्छ कलाकंद, मावा, बर्फी जप्त

Goa Politics: रवी नाईकांनंतर राज्यभरात सर्वमान्य असे नवे नेतृत्व कोण? चाचपणी सुरु; मार्चमध्ये पोटनिवडणूक शक्य

SCROLL FOR NEXT