Hockey 5s Asia Cup: भारताने पराभवाचा वचपा काढला! फायनलमध्ये पाकिस्तानला पराभूत करत वर्ल्डकपचं तिकिटही केलं पक्कं

Hockey 5s Asia Cup: आशिया चषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान आमने-सामने आहेत. पण दुसरीकडे, हॉकी 5S आशिया चषकात भारताने दमदार कामगिरी केली.
Indian Hockey Team
Indian Hockey TeamDainik Gomantak
Published on
Updated on

Hockey 5s Asia Cup: आशिया चषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान आमने-सामने आहेत. पण दुसरीकडे, हॉकी 5S आशिया चषकात भारताने दमदार कामगिरी केली. भारताने पाकिस्तानवर 6-4 असा विजय मिळवला.

सोशल मीडियावर भारतीय हॉकी संघाचं भरभरुन कौतुक होत आहे. मोहम्मद रहील, मनिंदर, गुरजोत सिंह यांनी शानदार कामगिरी केली.

मात्र आता अशी चर्चा सुरु झाली आहे की, हॉकीच्या मैदानात आपणं जिंकलो, पण क्रिकेटच्या मैदानात काय होणार?

दरम्यान, भारत-पाकिस्तान यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. पाकिस्तानने (Pakistan) गेममध्ये एकवेळ 3-2 अशी आघाडी घेतली होती. मात्र भारतीय खेळाडू अखेरच्या मिनिटांपर्यंत पाकिस्तानशी लढले.

दोन सत्राचा गेम संपला तेव्हा भारत-पाकिस्तान यांच्यातील चुरशीचा सामना 4-4 असा बरोबरीत होता. मात्र, या हाय होल्टेज सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला. पाकिस्तानने पहिल्या हाफमध्ये आघाडी घेऊन भारतीय संघाचं टेन्शन वाढवलं होतं.

मात्र भारतीय संघाचे खेळाडू मागे हटायला तयार नव्हते. पुन्हा एकदा गेममध्ये कमबॅक करत भारतीय संघाने सामना अधिक रंगतदार बनवला.

Indian Hockey Team
Hockey Junior Asia Cup 2023: पाकिस्तानला हरवून भारताने रचला इतिहास, जेतेपदावर कोरले नाव!

दुसरीकडे, भारतीय खेळाडूंनी पेनल्टी शूटआऊटमध्ये अफलातून कामगिरी करत पाकिस्तानवर 6-4 असा विजय मिळवला. विशेष म्हणजे, भारतीय संघ साखळी सामन्यात पाकिस्तानकडून हरला होता. मात्र पुन्हा कमबॅक करत भारतीय संघाने आपली उपस्थिती कायम ठेवली.

मलेशियाचा (Malaysia) दणदणीत पराभव करत भारताने फायनलमध्ये मजल मारली होती. तर दुसरीकडे, ओमानला पराभूत करत पाकिस्तानने फायनलचं तिकीट मिळवलं होतं. मात्र फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. आता भारताने वर्ल्डकपचं आपलं तिकीटं पक्क केलं आहे.

Indian Hockey Team
Hockey World Cup 2023: भारत-इंग्लंड संघात क्वार्टर-फायनलमध्ये थेट एन्ट्रीसाठी चढाओढ, असे आहे समीकरण

त्याचबरोबर, या शानदार विजयानंतर हॉकी इंडियाने प्रत्येक खेळाडूला 2 लाख तर सपोर्ट स्टाफला 1 लाखाचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com