Tribute will be pay to Pele during India vs Sri Lanka 2nd ODI
Tribute will be pay to Pele during India vs Sri Lanka 2nd ODI  Dainik Gomantak
क्रीडा

India vs Sri Lanka: दुसऱ्या वनडेदरम्यान पेलेंचा होणार सन्मान, ईडन गार्डनशी जोडलंय खास कनेक्शन

Pranali Kodre

India vs Sri Lanka: गुरुवारी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यादरम्यान ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचा सन्मान होणार आहे.

तीनवेळेचे विश्वविजेते खेळाडू पेले यांचे 29 डिसेंबर 2022 रोजी रात्री निधन झाले. ते गेल्या काही काळापासून कर्करोगाचा सामना करत होते. अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी वयाच्या 82व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे त्यांच्याप्रती आदर आणि सन्मान ईडन गार्डन्सवर व्यक्त केला जाणार आहे.

ईडन गार्डन्सवर खेळलेला सामना

ईडन गार्डन्सवर पेले यांनी 24 सप्टेंबर 1977 रोजी एक फुटबॉल सामना खेळला होता. त्यावेळी पेले न्यूयॉर्क कॉसमॉस क्लबकडून खेळत होते. याच संघाकडून खेळण्यासाठी ते कोलकात्याला आले होते. त्यावेळी न्युयॉर्क कॉसमॉसचा सामना बंगालमधील प्रसिद्ध क्लब मोहन बगान विरुद्ध झाला होता.

असे म्हटले जाते की त्यावेळी पेलेंची झलक पाहाण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. सामना पाहाण्यासाठीही 80 हजारांहून अधिक चाहते उपस्थित होते. तो सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता. पण या सामन्यात पेले यांना मोहन बगानच्या फुटबॉलपटूंनी एकही गोल करू दिला नव्हता. आजही या सामन्याची चर्चा होत असते.

(Tribute will be pay to legendary Brazilian footballer Pele during India vs Sri Lanka 2nd ODI)

ईडन गार्डनवर पेलेंचा सन्मान

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील वनडे सामन्यादरम्यान पेले यांच्या खेळाचे फुटेज दाखवण्यास येणार आहेत. तसेच त्यांच्याविरुद्ध खेळलेल्या मोहन बगान संघातील हयात असलेल्या खेळाडूनांही आमंत्रण देण्यात आले आहे.

भारतात पेले यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे जेव्हाही ते भारतात आले, त्यावेळी चाहत्यांकडून त्यांना मोठ्याप्रमाणात प्रेम मिळाले. ते काही कार्यक्रमांसाठी 2015 आणि 2018 साली देखील भारतात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रादो 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT