Football legend Pele Passed Away : महान फुटबॉलपटू पेलेने वयाच्या 16 व्या वर्षीच केला होता पहिला गोल

पेले 16 वर्षांचे असताना 1957 मध्ये त्यांनी अर्जेंटिनाविरुद्ध राष्ट्रीय पदार्पणातच गोल केला. पुढच्याच वर्षी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत ब्राझीलनने यजमान स्वीडनचा पराभव करून पहिले वहिले विश्वकरंडक विजेतेपद मिळवले त्यात संपूर्ण स्पर्धेत पेले यांनी सहा गोल केले.
Football legend Pele Passed Away : महान फुटबॉलपटू पेलेने वयाच्या 16 व्या वर्षीच केला होता पहिला गोल

मूळ नाव एडसन अरांतेस डो नासिमेंतो, परंतु पेले या दोन आद्याक्षरांनी संपूर्ण फुटबॉल आणि क्रीडा विश्वाला आपल्या जादुई खेळाने भूरळ पाडणाऱ्या या महान फुटबॉलपटूचे काल गुरुवारी रात्री उशिरा वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. फुटबॉल खेळाला सर्वांग सुंदर करणारे आद्य फुटबॉलपटू म्हणून पेले यांची ओळख होती. कतारमध्ये नुकत्याच संपलेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेदरम्यान पेले यांची प्रकृती खालावली होती.

पेले 16 वर्षांचे असताना 1957 मध्ये त्यांनी अर्जेंटिनाविरुद्ध राष्ट्रीय पदार्पणातच गोल केला. पुढच्याच वर्षी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत ब्राझीलनने यजमान स्वीडनचा पराभव करून पहिले वहिले विश्वकरंडक विजेतेपद मिळवले त्यात संपूर्ण स्पर्धेत पेले यांनी सहा गोल केले.

तीन विश्वकरंडक जिंकण्याचा विक्रम

वयाच्या 16 व्या वर्षी विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्या इतकी त्यांची महानात होती. १९५७ मध्ये त्यांनी विश्वकरंडक स्पर्धेत पदार्पण केले त्यानंतर १९७० पर्यंत ते चार विश्वकरंडक स्पर्धा खेळले. ब्राझीलकडून तीन विश्वकरंडक जिंकण्याचा त्यांचा विक्रम आजही कायम आहे.

पेले यांची दिमाखदार कारकीर्द

पेले यांनी ब्राझीलकडून 77 गोल केले. या व्यतिरिक्त प्रथम श्रेणीत 1281 गोलांचे योगदान दिले.

पेले यांनी ब्राझीलला तीन विश्वकरंडक जिंकून दिले. पेले हे नाव अमेरिका शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांच्या नावावरून पडल. त्यांचे खरे नाव एडसन अरांतेस डो नासिमेंतो आहे. पेले हे 15 वर्षांचे असताना त्यांनी सांतोस हा क्लब जॉईन केले. 1956 मध्ये ते पहिला क्लब सामना खेळले त्यात त्यांनी 4 गोल केले.

वयाच्या 17 वर्षी पेले विश्वकरंडक जिंकणारे सर्वात कमी वयाचे फुटबॉलपटू ठरले. त्यांनी अंतिम सामन्यात यजमान स्वीडनविरुद्ध दोन गोल केले. 19 नोव्हेंबर 1969 रोजी त्यांनी आपल्या कारकिर्दीतील एक हजारावा गोल केला. त्यानिमित्ताने सांतोस या क्लबने हा दिवस पेले दिवस म्हणून साजरा केला. पेले यांनी 1970 च्या विश्वकरंडक स्पर्धेत इटलीविरुद्ध आपला आंतरराष्ट्रीय 100 वा गोल केला.

1993 मध्ये पेले यांचा राष्ट्रीय फुटबॉल हॉलचा सन्मान दिला. पेले असे एकमेव खेळाडू आहे ज्यांनी सर्वाधिक तीन विश्वकरंडक जिंकले आहेत. 1995 मध्ये पेले यांना ब्राझीलचे क्रीडा मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले 1998 पर्यंत ते या पदावर कायम होते. 1997 मध्ये त्यांना ब्रिटिश नाईटहूड हा पुरस्कार देण्यात आला. 1999 मध्ये पेले यांना आंतरराष्ट्रीय ऑलिंपिककडून शतकातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

Football legend Pele Passed Away : महान फुटबॉलपटू पेलेने वयाच्या 16 व्या वर्षीच केला होता पहिला गोल
Football legend Pele Passed Away : मृत्यूशी झुंज अपयशी; जगप्रसिद्ध फुटबॉलपटू पेले काळाच्या पडद्याआड

विक्रमादित्य फुटबॉलपटू

ब्राझीलकडून सर्वाधिक गोल : 77

सांतोस क्लबकडून सर्वाधिक गोल : 643

आंतरखंडीय करंडक स्पर्धेत सर्वाधिक 7 गोल

जागतिक फुटबॉलमध्ये सर्वाधिक हॅटट्रिक : 92

कारकिर्दीत सर्वाधिक गोल (मैत्रीपूर्ण सामन्यासह) : 1281

सर्वाधिक विश्वकरंडक जिंकणारे खेळाडू : 3

सर्वात लहान विश्वकरंडक विजेते खेळाडू : 17 वर्षे 249 दिवस

विश्वकरंडक स्पर्धेत गोल करणारे सर्वात लहान खेळाडू : 17 वर्षे, 239 दिवस

विश्वकरंडक स्पर्धेत हॅटट्रिक करणारे सर्वात लहान खेळाडू : 17 वर्षे 244 दिवस

विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना खेळणारे सर्वात लहान खेळाडू : 17 वर्षे 249 दिवस

विश्वकरंडक स्पर्धेत इतरांच्या गोलासाठी सर्वाधिक सहाय्य (असिस्ट) करणारे खेळाडू : 10

एकाच विश्वकरंडक स्पर्धेत गोलासाठी सर्वाधिक सहाय्य : 6

विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक गोल : 3

एकाच वर्षात (कॅलेंडर इयर) सर्वाधिक गोल : 127

--------------------------------------------

संघ : सामने: गोल

सांतोस : 660 : 643

न्यूयॉर्क कॉसमॉस : 64 : 37

ब्राझील : 92 : 77

मिलिट्री टीम : 4 : 4

साओ पावलो चाचणी स्पर्धा : 15 : 12

इतर चाचणी स्पर्धा : 5 : 2

एकूण : 840 : 775

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com