Kane Williamson | Trent Boult | Angelo Mathews ICC
क्रीडा

NZ vs SL: विलियम्सन अन् बोल्टकडून बॅटिंगला आलेल्या मॅथ्यूजची 'टाईम आऊट'वरून मस्करी, ICC ने शेअर केला Video

Angelo Mathews timed out: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचे खेळाडू विलियम्सन आणि बोल्ट श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजची टाईम आऊटबाबत मस्करी करताना दिसले होते.

Pranali Kodre

Trent Boult and Kane Williamson jokes about helmet strap with Angelo Mathews during New Zealand vs Sri Lanka match in CWC23:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत गुरुवारी (9 नोव्हेंबर) न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात सामना झाला. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने 5 विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात एक मजेशीर घटना घडली.

झाले असे की या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंका संघाने 9 व्या षटकात चरिथ असलंकाची विकेट गमावली. त्यामुळे श्रीलंका 70 धावांवर 4 विकेट असा संघर्ष करत होते. त्याचवेळी सहाव्या क्रमांकावर अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीला आला.

मॅथ्यूज काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊट होणारा पहिला क्रिकेटपटू ठरल्याने चर्चेत होता. याबाबत न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आणि ट्रेंट बोल्ट यांनी त्याला मजेने छेडले.

यावेळी बऱ्याचदा शांत असलेला विलियम्सनही मजेने मॅथ्यूजला त्याचे हेल्मेट ठिक आहे ना, अशा संदर्भात काहीतरी बोलून मस्करी करताना दिसला. विलियम्सन आणि बोल्ट यांच्या या मस्करीवर मॅथ्यूजही हसताना दिसला. या घटनेचा व्हिडिओही आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे

विलियम्सनने का केली हेल्मेटवरून मॅथ्यूजची मस्करी?

6 नोव्हेंबर रोजी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा सामना झाला. या सामन्यात श्रीलंका प्रथम फलंदाजीला उतल्यानंतर 25 व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर सहाव्या क्रमांकावर अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीला उतरणार होता, तो मैदानात आलाही, पण पहिला चेंडू खेळण्यापूर्वीच हेल्मेटची काहीतरी समस्या झाल्याने परत गेला.

त्यावेळी बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन आणि संघाने त्याच्याविरुद्ध टाईम आऊट नियमानुसार बादसाठी पंचांकडे अपील केले. पंचांनाही नियमानुसार त्याला बाद द्यावे लागले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊट होणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला. या घटनेनंतर बऱ्याच चर्चा झाल्या. तसेच मॅथ्यूजनेही जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

याच घटनेनंतर विलियम्सन मजेने गुरुवारी मॅथ्यूजची थट्टा करताना दिसला होता.

न्यूझीलंडचा विजय

दरम्यान, गुरुवारी मॅथ्यूज फलंदाजीत फार काही करू शकला नाही. तो 16 धावा करून बाद झाला. पण श्रीलंकेकडून कुशल परेराने आक्रमक खेळताना 9 चौकार आणि 2 षटकारांसह 28 धावांत 51 धावांची खेळी केली. पण अन्य कोणालाही फार काही करता आले नाही.

त्यामुळे श्रीलंकेचा संघ 46.4 षटकात 171 धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर न्यूझीलंडने 172 धावांचे आव्हान 23.2 षटकातच पूर्ण केले. न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनवेने 45 धावांची खेळी केली, तर डॅरिल मिचेरने 43 धावा आणि रचिन रविंद्रने 42 धावा केल्या. श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT