President of FC Goa Nandan Piramal Dainik Gomantak
क्रीडा

FC Goa: एफसी गोवा संघाच्या नेतृत्वात बदल; नंदन पिरामल नवे अध्यक्ष

रवी पुस्कुर यांच्याकडे ‘सीईओ’ जबाबदारी, अक्षय टंडन मुक्त

किशोर पेटकर

President Of FC Goa Nandan Piramal: एफसी गोवा संघ व्यवस्थापनात नवे महत्त्वाचे बदल झाले आहेत. नंदन पिरामल संघाचे नवे अध्यक्ष असतील, तर संघाचे सहमालक अक्षय टंडन अध्यक्षपदातून मुक्त झाले आहेत.

यापूर्वी फुटबॉल संचालक म्हणून कार्यरत असलेले रवी पुस्कुर यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) या पदाची जबाबदारी राहील.

एफसी गोवातर्फे सोमवारी नव्या बदलांची माहिती देण्यात आली. नंदन पिरामल हे भारतीय फुटबॉलला नवे नाहीत. आय-लीग फुटबॉल स्पर्धेत खेळलेल्या पुणे एफसी संघाचे ते मालक होते.

अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालेले अक्षय टंडन आता दैनंदिनी कर्तव्ये पार पाडतील, असे एफसी गोवाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.

टंडन यांनी एफसी गोवा संघाच्या विकासात आणि यशस्वी वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली एफसी गोवाने फुटबॉलमधील युवा विकास आणि पायाभूत प्रगतीत भरीव कार्य केले होते.

‘‘एफसी गोवासोबतचा माझा प्रवास अभिमानास्पद आणि समाधानाचा ठरला. आमच्या वचनबद्धतेनुसार युवा आणि पायाभूत फुटबॉल विकासाचे ध्येय एफसी गोवाने पूर्ण केले याचा अभिमान वाटतो,’’ असे टंडन यांनी नमूद केले.

‘‘आमच्या संघाच्या नेतृत्वात अध्यक्ष या नात्याने नंदन सामील झाल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे. त्यांची खेळाबद्दलची आवड आणि फुटबॉलप्रती सखोल समज एफसी गोवाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे,’’ असे संघाचे मालक जयदेव मोदी यांनी नव्या अध्यक्षाचे स्वागत करताना सांगितले.

संघाच्या अध्यक्षपदी बदल झालेला असला, तरी जयदेव मोदी, क्रिकेटपटू विराट कोहली व अक्षय टंडन ही एफसी गोवा क्लबची मालकी संरचना कायम आहे.

‘‘अक्षय यांनी मोठ्या उत्कटने आणि मेहनतीने संघाचे नेतृत्व केले. आता त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे आणि भूतकाळातील यशस्वी कामगिरीवच्या बळावर एफसी गोवा संघाची उभारणी करायची आहे. आमच्या चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंबा कायम राखेल अशीच कामगिरी संघ बजावेल,’’ असा विश्वास नवे अध्यक्ष नंदन पिरामल यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मोरजाई देवस्थान वादात हायकोर्टाचा कठोर इशारा; '13 ऑक्टोबरपर्यंत सर्व रेकॉर्ड्स द्या, अन्यथा FIR दाखल करु'

Dengue Shock Syndrome: काय आहे डेंग्यू शॉक सिंड्रोम? कसा बनतो मृत्यूचं कारण? दुर्लक्ष करणं पडू शकत महागात; जाणून घ्या लक्षणे आणि बचावात्मक उपाय

Goa Drug Bust: शिवोलीत 2.53 कोटींचा अंमली पदार्थ जप्त, गोवा पोलिसांनी मोडले ड्रग्ज रॅकेटचे कंबरडे; नायजेरियन तस्करावर कारवाई

BJP Workers Fight: चहा-नाश्त्यावरून वाद, भाजप कार्यालयातच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी Watch Video

IAF Dinner Menu: रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान; भारतीय वायुसेनेचा मेनू व्हायरल, पाकच्या उद्धवस्त एअरबेसची नावे पदार्थांना दिली

SCROLL FOR NEXT