Tokyo Paralympics: Praveen Kumar wins silver in high jump  Dainik Gomantak
क्रीडा

Tokyo Paralympics: प्रवीणच्या उंच उडीनं भारताचा पदकांचा आलेख आणखी उंचावला

पॅरा धावपटू प्रवीण कुमारने (Praveen Kumar) टोकियो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics ) रौप्य पदक (Silver Gold) जिंकले आहे.

दैनिक गोमन्तक

पॅरा धावपटू प्रवीण कुमारने (Praveen Kumar) टोकियो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics ) रौप्य पदक (Silver Gold) जिंकले आहे. नोएडा येथील 18 वर्षीय प्रवीणने पुरुषांच्या उंच उडी (High Jump) टी 64 प्रकारात 2.07 मीटर उडी मारली आणि दुसरे स्थान मिळवले. त्याने आशियाई विक्रमासह रौप्य पदक जिंकले. ग्रेट ब्रिटनच्या ब्रूम-एडवर्ड्स जोनाथन (2.10 मी) ने सुवर्णपदकावर कब्जा केला. या स्पर्धेचे कांस्यपदक पोलंडच्या लेपियाटो मासिजो (2.04 मीटर) ने जिंकले आहे. (Tokyo Paralympics: Praveen Kumar wins silver in high jump)

या खेळांमध्ये देशातील पदकांची संख्या 11 वर पोहोचली आहे. ज्या खेळाडूंना काही कारणास्तव त्यांचे पाय कापून टाकावे लागले ते T64 वर्गात स्पर्धा करतात आणि कृत्रिम पायाने उभे राहून स्पर्धा करतात. प्रवीण T44 वर्गाच्या अंतर्गत येतो, परंतु तो T64 स्पर्धेतही भाग घेऊ शकतो.

टोकियो गेम्सच्या उंच उडीत भारताला 4 पदके मिळाली आहेत. यापूर्वी भारताच्या मरिअप्पन थंगावेलूने उंच उडी टी 63 स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते , तर शरद कुमारला कांस्यपदक मिळाले आहे. आणि निषाद कुमारने T47 मध्ये रौप्य पदक जिंकले आहे.

सध्याच्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 11 पदके जिंकली आहेत. भारताकडे आता 2 सुवर्ण, 6 रौप्य आणि 3 कांस्यपदके आहेत. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. रिओ पॅरालिम्पिक (2016) मध्ये भारताने 2 सुवर्णांसह 4 पदके जिंकली होती.

पदक जिंक्ल्यानांतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवीण कुमार यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्वीट करत - "पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल प्रवीण कुमारचा अभिमान वाटतो आहे . हे पदक त्याच्या मेहनतीचे आणि अतुलनीय समर्पणाचे फळ आहे. त्यांचे अभिनंदन. त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा." शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT