सिंधुने डेनमार्क मिया ब्लिचफेल्ट हिला सरळ सेटमध्ये नमवत अंतिम आठमध्ये जागा मिळविली आहे. Dainik Gomantak
क्रीडा

Tokyo Olympics: सिंधुची पदकाच्या दिशेने वाटचाल सुरु, दासचा अचूक निशाणा

पदार्पणात बॉक्सिंगमध्ये सतीश कुमारची (Satish Kumar in boxing) चमकदार कामगिरी, भारतीय पुरुषांच्या हॉकीसंघाने (Hockey) बलाढ्य अर्जेंटीनाला 3-1 अशी धूळ चारत उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा पक्की केली आहे.

दैनिक गोमन्तक

टोकियो: ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympics) भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधु (Badminton player PV Sindhu) हिने आपली लय कायम ठेवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आज तिने डेनमार्क मिया ब्लिचफेल्ट हिला सरळ सेटमध्ये नमवत अंतिम आठमध्ये जागा मिळविली आहे.

41 मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंधुने जगातील 12 व्या क्रमांकाची डेनमार्कची खेळाडू मिया ब्लिचफेल्टला 21-15, 21-13 असा सहज पराभव केला आहे. मिया विरुध्द सिंधुचा ही पाचवा विजय आहे.

दुसरीकडे भारताच्या साई प्रणीतला मात्र पराभावाचा सामना करावा लागला आहे. नेदरलँडच्या मार्क कैलजॉवने प्रणीतला 21-14, 21-14 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला आहे.

पदार्पण करणाऱ्या सतीश कुमारची चमकदार कामगिरी

पदार्पण करणाऱ्या सतीश कुमारची चमकदार कामगिरी

बॉक्सिंगमध्ये (Boxing) भारताकडून (India) प्रथमच ऑलिंपिक स्पर्धा खेळणाऱ्या सतीश कुमारने (Satish Kumar) रिकार्डो ब्राउनचा 4-1 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सतीशने 91 किलो पेक्षा जास्त वजनी गटात जमेकाच्या रिकार्डो ब्राउन 4-1 अशा फरकाने नमविले, सतीश कुमारने पहिल्या राऊंडमध्ये जबरदस्त प्रदर्शन केले. पण रिकार्डोच्या एका पंचवर सतीश जखमी देखील झाला. तरी तो शेवटपर्यंत लढत राहिला आणि त्याने 4-1 असा सामना जिंकला. सतीशने पदार्पणातच केलेल्या या कामगिरीमुळे त्याच्याकडून आता पदकाची अपेक्षा आहेत. एशियाई स्पर्धेत सतीशने दोनदा कांस्य पदक मिळविले आहे.

अतनु दासचा तिरंदाजीत अचूक निशाणा

अतनु दासचा तिरंदाजीत अचूक निशाणा

तिरंदाजीत देखील आज भारताच्या अतनु दासने (Atanu Das) पुरुषांच्या व्यक्तिगत स्पर्धेत दक्षिण कोरीयाच्या ओह जिन हयेकचा पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात अतनु दासने के ओह जिन हयेकचा शूट आफमध्ये पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थन मिळविले आहे.

हॉकीत युवा ब्रिगेडने बलाढ्य अर्जेंटीनाला चारली धूळ

हॉकीत युवा ब्रिगेडने बलाढ्य अर्जेंटीनाला चारली धूळ

भारतीय पुरुषांच्या हॉकीसंघाने (Indian men's hockey team) बलाढ्य अर्जेंटीनाला 3-1 अशी धूळ चारत उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा पक्की केली आहे. भारताने मागील सामन्यात स्पेनचा पराभव करत पुन्हा लय पकडली तीच लय आजही कायम राखत भारतीय हॉकी संघाने रिओ ऑलिंपिकमधील पदक विजेत्या अर्जेंटीनाचा पराभवाचा धक्का दिला आहे. भारताच्या युवा ब्रिगेडने या विजयात प्रमुख सूत्रधाराची भूमिका निभावली आहे. या विजयामुळे भारतला चार दशकानंतर ओलिंपिक पदक जिंकण्याची भारताला चांगली संधी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: 'पाकिस्तान झिंदाबाद' फलक प्रकरणी बजरंग दल आक्रमक; तक्रार दाखल

'गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान, नागरिकांसाठी मात्र असुरक्षित', LOP युरींचे टीकास्त्र; कायदा व सुव्यवस्था विषयावर अधिवेशन बोलवण्याची मागणी

Goa ZP Election: आरक्षित मतदारसंघांची यादी जाहीर! कवळेकर समर्थकांना धक्‍का, काब्राल समर्थकाला दिलासा; फोंड्यात महिलाराज

Goa Road Diversions: ‘आयर्नमन 70.3’ मुळे गोव्यात वाहतूक मार्गात बदल! पर्यायी रस्ते कोणते? जाणून घ्या..

Kala Academy: 'कला अकादमीच्या दुरुस्तीचे लेखापरीक्षण, चौकशी करा'! कला राखण मांडची मागणी; सचिवांशी विविध विषयांवर चर्चा

SCROLL FOR NEXT