Tokyo Olympics: सिंधुची विजयी घौडदौड कायम, हॉकीत मात्र महिलांचा पराभव

या विजयामुळे सिंधुने (P.V. Sindhu) राऊंड ऑफ 16 मध्ये जागा मिळविली आहे. महिलांच्या हॉकी स्पर्धेत भारतीय महिलांना पुन्हा एकदा अपयश आले आहे. या सामन्यात ब्रिटनने भारताचा 4-1 असा सहज पराभव केला.
या विजयामुळे सिंधुने राऊंड ऑफ 16 मध्ये जागा मिळविली आहे.
या विजयामुळे सिंधुने राऊंड ऑफ 16 मध्ये जागा मिळविली आहे.Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

टोकियो ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympics) भारताची बॅडमिंटनपटू (Badminton of India) पी.व्ही. सिंधुने (P.V. Sindhu) जागतीक क्रमवारीत 34 साव्या क्रमांकावर असणाऱ्या हाँगकाँगची चियुंग एंगान यी ला 21-9, 21-16 असा सरळ सेटमध्ये पराभव करत सामना जिंकला आहे. या विजयामुळे सिंधुने राऊंड ऑफ 16 मध्ये जागा मिळविली आहे.

या विजयामुळे सिंधुने राऊंड ऑफ 16 मध्ये जागा मिळविली आहे.
Tokyo Olympics: सिंधुचा विजयी स्मॅश, पण नेमबाजीत, टेनिसमध्ये भारताचा पराभव

पहिल्या सेटमध्ये पी.व्ही.सिंधूने शानदार सुरुवात करत, पहिला सेट 21-9 असा जिंकला. सिंधुच्या या विजयामुळे टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताच्या पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. सिंधुने टोकियो ऑलिंपिकमध्ये इज्राइलच्या सेनिया पोलिकारपोवाला नमवून टोकियो ऑलिंपिकमध्ये जबरदस्त सुरुवात केली होती.

या विजयामुळे सिंधुने राऊंड ऑफ 16 मध्ये जागा मिळविली आहे.
Tokyo Olympics: भारतीय हॉकी संघाचे कमबॅक, जपानवर आता वादळाचे संकट

दुसरीकडे महिलांच्या हॉकी स्पर्धेत भारतीय महिलांना पुन्हा एकदा अपयश आले आहे. या सामन्यात ब्रिटनने भारताचा 4-1 असा सहज पराभव केला. भारतीय महिलांना या सामन्यात गरजे पेक्षा जास्त बचावात्मक खेळाचा फटका बसला. हा भारतीय हॉकी महिला संघाचा सलग तिसरा पराभव आहे. या पराभवामुळे भारतीय महिला हॉकी संघाच्या पदकाच्या आशा धूसर झाल्या आहेत. गत विजेता ब्रिटनकडून हेना मार्टिनने, लिली आउस्ले आणि ग्रेस बाल्सडन यांनी प्रत्येकी एक गोल केले. तर भारताकडून शर्मिला देवीने एकमात्र गोल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com