Tokyo Olympics: मेरी कॉमचा विजयी पंच, मनिकाचाही संघषपूर्ण विजय

टोकियो ऑलिंपिकमध्ये मेरी कॉम (Mary Kom) कडून भारताला पदकाची आशा आहे. तीने पहिल्या सामन्यात गार्सियाचा 4-1 असा सहज पराभव केला. 57 मिनिटांच्या या लढतीत मनिकाने (Manika Batra) संघर्षपूर्ण विजय मिळविला आहे.
मेरी कॉमने पहिल्या सामन्यात गार्सियाचा 4-1 असा सहज पराभव केला.
मेरी कॉमने पहिल्या सामन्यात गार्सियाचा 4-1 असा सहज पराभव केला.Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

टोकियो: टोकियो ऑलिंपिक (Tokyo Olympics) स्पर्धेत भारताची सुपर मॉम मेरी कॉमने (India's Super Mom Mary Kom) डोमिनिक रिपब्लिकच्या गार्सियाला सुपर पंच (Super Punch) देत ऑलिंपिकमध्ये विजयाचे खाते उघडले आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये मेरी कॉमकडून भारताला पदकाची आशा आहे. तीने पहिल्या सामन्यात गार्सियाचा 4-1 असा सहज पराभव केला. या विजयासह तीने राऊंड-16 मध्ये आपले स्थान पक्के केले आहे.

मेरी कॉमला चारही प्रशिक्षकांनी 30, 28, 29, 30, 29 असे अंक दिले तर गार्सियाला 27, 29, 28, 27, 28 असे अंक दिले आहेत. या आधी काल भारताचा बॉक्सर विकास कृष्णाला पहिल्या राउंडमध्येच पराभावाला सामोरे जावे लागले होते. 69 किलो गटात भारताच्या विकास कृष्णाला जपानच्या मेनसाहने 5-0 असे हरविले. त्यामुळे आता बॉक्सिंगमध्ये मेरी कॉमवर भारताच्या अपेक्षा आहेत.

मेरी कॉमने पहिल्या सामन्यात गार्सियाचा 4-1 असा सहज पराभव केला.
Tokyo Olympics: सिंधुचा विजयी स्मॅश, पण नेमबाजीत, टेनिसमध्ये भारताचा पराभव
टेबल टेनिसच्या (Table tennis) महिलांच्या एकेरी सामन्यात भारताची स्टार मनिका बत्राने संघर्षपूर्ण विजय मिळविला आहे.
टेबल टेनिसच्या (Table tennis) महिलांच्या एकेरी सामन्यात भारताची स्टार मनिका बत्राने संघर्षपूर्ण विजय मिळविला आहे.Dainik Gomantak

मनिकाचा संघषपूर्ण विजय

दुसरीकडे टेबल टेनिसच्या (Table tennis) महिलांच्या एकेरी सामन्यात भारताची स्टार मनिका बत्राने (Manika Batra) पहिले दोन सेटमध्ये पराभव होऊन देखील नंतर जबरदस्त कमबॅक करत युक्रेनच्या मारग्रेट पेसोत्सकाचा 4-3 असा पराभव करत पुढील राऊंडमध्ये प्रवेश केला. 57 मिनिटांच्या या लढतीत मनिकाने संघर्षपूर्ण विजय मिळविला आहे. तिने 4-11, 4-11, 11-7, 12-10, 8-11, 11-5, 11-7 असा सामना जिंकला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com