Tokyo Olympics: PV Sindhu gives wins bronze medal Dainik Gomantak
क्रीडा

Tokyo Olympics: पी.व्ही.सिंधूचे कमबॅक, कांस्यपदकावर शिक्कामोर्तब

पी.व्ही.सिंधूने महिला एकेरीच्या सामन्यात चीनच्या हे बिंगजियाओचा 21- 13, 21-15 असा पराभव केला आहे.(Tokyo Olympics)

दैनिक गोमन्तक

टोकियो(Tokyo Olympics) मध्ये सुरु असलेल्या ऑलम्पिक स्पर्धेत भारताला आणखीन एक पदक मिळाले आहे. बॅडमिंटन(Badminton) मध्ये भारताची स्टार खेळाडू पी.व्ही.सिंधूला(PV Sindhu) कांस्यपदक(Bronze Medal) मिळाले आहे. पी.व्ही.सिंधूने महिला एकेरीच्या सामन्यात चीनच्या हे बिंगजियाओचा 21- 13, 21-15 असा पराभव केला आहे. (Tokyo Olympics: PV Sindhu gives wins bronze medal)

याच बरोबर पी.व्ही.सिंधूने आपल्या नावावर एक इतिहासही रचला आहे कारण दोन ऑलम्पिक पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे हे तिसरे पदक आहे. प्रथम मीराबाई चानूने 49 किलो वेटलिफ्टिंग प्रकारात रौप्य पदक पटकावले असून बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनने 69 किलो वेल्टरवेट प्रकारात उपांत्य फेरी गाठून भारतासाठी पदकाची खात्री केली आहे.

26 वर्षीय सिंधूचे ऑलिम्पिकमधील हे दुसरे पदक आहे. यापूर्वी त्याने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. यासह सिंधू ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी दुसरी भारतीय बनली आहे. त्याच्या आधी कुस्तीपटू सुशील कुमारने ही अनोखी कामगिरी केली आहे. सुशीलने बीजिंग ऑलिम्पिक (2008) मध्ये कांस्य आणि लंडन ऑलिम्पिक (2012) मध्ये रौप्य जिंकले होते.

एकूण ऑलिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे हे तिसरे पदक आहे. सिंधू व्यतिरिक्त सायना नेहवालनेही ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावले आहे. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कांस्यपदक मिळवले होते आणि आजचे हे भारतासाठी तिसरे पदक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT