पणजीः टोकियो ऑलिंपिकनिमित्त (Tokyo Olympic) गोव्यातील जागृती उपक्रमांतर्गत रविवारी ॲथलिट्स, गोवा ॲथलेटिक्स संघटनेचे (Goa Athletics Association) पदाधिकारी, तायक्वांडोपटू, राज्य तायक्वांडो (Taekwondo) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना गौरविण्यात आले. पणजी येथे गोवा ॲथलेटिक्स संघटनेचे श्रीपाद कुंडईकर, सोनाली शेट्येकर, डेझिरी परेरा, टेडी कार्दोझ, आदित्य वळवईकर यांचा वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीसाठी, तसेच संघटनेचे सचिव परेश कामत व खजिनदार गुरू सावंत यांचा ॲथलेटिक्ससाठी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी गोवा ऑलिंपिक संघटनेचे उत्तर विभागीय समन्वयक चेतन कवळेकर, संदीप हेबळे, जयेश नाईक, राजेंद्र गुदिन्हो, सनथ भरणे यांची उपस्थिती होती.
मडगाव येथील कार्यक्रमात तायक्वांडो खेळात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले रश्मी नाईक, रेश्मा करमळी, इनोश्का रॉड्रिग्ज, प्रणिता तारी, किंबर्ली फर्नांडिस यांचा गोवा क्रीडा प्राधिकरमाचे सहाय्यक सचिव महेश रिवणकर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.