इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये, आपण ऐकत असतो आज सुपर रविवार किंवा सुपर शनिवार आहे. हे असे म्हटले जाते कारण एकाच दिवशी IPL चे दोन सामने खेळले जातात, परंतु आज IPL मधील सुपर फ्रायडे (शुक्रवार) असे म्हणता येईल, कारण आज दोन सामने खेळले जाणार असून, आश्चर्याची गोष्ट म्हणजे आयपीएलच्या इतिहासात (History) पहिल्यांदाच एकाच वेळी दोन सामने सुरू होणार आहेत. एकाच वेळी चार संघ खेळणार आहेत.
खरे तर, आयपीएल 2021 च्या 55 व्या साखळी सामन्यात शुक्रवार, 8 ऑक्टोबर रोजी मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होईल, तर दिल्ली कॅपिटल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशी होणार आहे. हे दोन्ही सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील. मुंबई विरुद्ध हैदराबाद सामना अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियमवर खेळला जाईल, तर दिल्ली आणि बेंगळुरू संघातील सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
आयपीएलच्या 14 व्या हंगामातील प्लेऑफ पाहता हा सामना अतिशय खास आहे. अधिकृतपणे, मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे, परंतु आकडेवारी पाहता, या मैदानावर एवढा मोठा विजय मिळविणे अश्यक्य आहे. त्यामुळे मुंबईच्या प्लेऑफसाठी पात्र ठरण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत.
दिल्ली सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. हा संघ अव्वल दोनमध्ये राहील, परंतु रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अव्वल 2 मध्ये येण्याची संधी आहे. जेथे संघांना अंतिम फेरी गाठण्याच्या दोन संधी आहेत. बंगळुरूच्या खात्यात सध्या 16 गुण आहेत. तर चेन्नईचा संघ 18 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जर बेंगळुरू संघ थोड्या फरकाने जिंकला, तर निव्वळ रन रेटमुळे, संघाला तिसऱ्या स्थानावर राहावे लागेल, कारण सीएसकेचा नेट रन रेट सध्या प्लसमध्ये आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.