IPL 2021: प्ले-ऑफच्या चौथ्या जागेसाठी 3 संघांमध्ये चुरस

पॉइंट टेबलमध्ये कोलकातापेक्षा (KKR) कमी असूनही, मुंबईचा संघ असा आहे की त्याच्याकडे प्लेऑफ गाठण्याची क्षमता आहे. पण आता प्रत्येक सामना मुंबईसाठी महत्त्वाचा झाला आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरले आहे.
IPL 2021 चौथा संघ कोणता असेल हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. टॉप 4 मधील 4 संघाचे समीकरण असे असेल.
IPL 2021 चौथा संघ कोणता असेल हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. टॉप 4 मधील 4 संघाचे समीकरण असे असेल.Dainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2021 मध्ये पहिला आणि दुसरा टप्पा मिळून आता 49 सामने झाले असून, साखळी फेरीतील आता फक्त 7 सामने शिल्लक आहेत. आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings), दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) या तीन संघांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. तर सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) स्पर्धेबाहेर पडले आहेत. उर्वरित 4 संघांना आता प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. चौथा संघ कोणता असेल हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. टॉप 4 मधील 4 संघाचे समीकरण असे असेल.

IPL 2021 चौथा संघ कोणता असेल हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. टॉप 4 मधील 4 संघाचे समीकरण असे असेल.
IPL 2021: PBKS ला नमवत RCB ची प्लेऑफमध्ये धडाकेबाज एन्ट्री

चेन्नईचे 12 सामन्यात नऊ विजय आणि 3 पराभवांसह 18 गुण आहेत. त्यांचा नेट रेट +0.829 आहे. चेन्नईला अजून 2 सामने खेळायचे आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2021 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनला आहे.

दिल्लीने 12 पैकी 9 सामने जिंकले आहेत. त्यांना तीन पराभवाला सामोरे जावे लागले असून, त्यांचे 18 गुण आहेत. दिल्लीचे नेट्रेट +0.551 आहे. दिल्लीचा संघही प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे.

बंगळुरू संघाने 12 पैकी 8 सामने जिंकले आहेत, तर 4 मध्ये पराभूत झाले आहेत. आरसीबीचे 16 गुणांसह या संघाने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. त्यांचा नेट रन रेट -0.157 आहे.

IPL 2021 चौथा संघ कोणता असेल हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. टॉप 4 मधील 4 संघाचे समीकरण असे असेल.
IPL 2021: ख्रिस मॉरिसचा आपल्याच संघांला 'रॉयल' दणका

पॉइंट टेबलमध्ये कोलकातापेक्षा कमी असूनही, मुंबईचा संघ असा आहे की त्याच्याकडे प्लेऑफ गाठण्याची क्षमता आहे. पण आता प्रत्येक सामना मुंबईसाठी महत्त्वाचा झाला आहे. मुंबई इंडियन्स गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरले आहे. 12 सामन्यांत 5 विजयांसह मुंबईचे 10 गुण आहेत. त्यांचा नेट रेट -0.453 आहे. संघाला आपला पुढील सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळायचा आहे.

स्पर्धेतील सर्वात अशुभ संघ मानल्या गेलेल्या पंजाब किंग्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या शक्यता नष्ट झाल्या आहेत. त्यांच्या 13 सामन्यात 5 विजयांसह 10 गुण आहेत. जर पंजाब संघाने उर्वरित सामना जिंकला आणि इतर संघ पराभूत झाले, तर त्यांना 12 गुणांसह संधी मिळू शकते. त्यांचा पुढील सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. जर पंजाब हा सामना हरला, इतर कोणत्याही संघाने 14 गुण मिळवले तर पंजाब किंग्स बाहेर पडेल.

IPL 2021 चौथा संघ कोणता असेल हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. टॉप 4 मधील 4 संघाचे समीकरण असे असेल.
IPL 2021: हार्दिकमुळे मुंबईच्या प्लेऑफच्या आशा जिवंत

राजस्थानने शनिवारी चेन्नई सुपर किंग्जसारख्या बलाढ्य संघाला एकतर्फी लढतीत पराभूत करत आपले इरादे स्पष्ट केले आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत हा संघ जिवंत असून त्यांचा नेट रन रेट देखील मुंबई पेक्षा चांगला आहे. या संघाचे 12 सामन्यात 8 गुण आहेत आणि त्यांची प्लेऑफची लढाई इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून असेल.

2016 चे चॅम्पियन आणि सनरायझर्ससाठी हा विसरण्याजोगा हंगाम राहिला आहे. ते गेल्या काही हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचले होते. त्यांचे 12 सामन्यात 4 गुण आहेत. संघाने फक्त दोन सामने जिंकले आहेत. आता सनरायझर्सचे पुढील दोन सामने RCB आणि मुंबई विरुद्ध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com