New Zealand Team  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: गब्बरची विकेट घेताच टीम साऊदीचा जलसा, 200 बळी पूर्ण करणार ठरला 5 वा गोलंदाज

IND vs NZ: न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने शिखर धवनच्या विकेटसह खास यादीत आपले स्थान निर्माण केले आहे.

दैनिक गोमन्तक

India vs New Zealand: न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने शिखर धवनच्या विकेटसह खास यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 बळी घेणारा तो न्यूझीलंडचा 5 वा गोलंदाज ठरला आहे. धवनच्या रुपात त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 बळी पूर्ण केले. साऊदीने आतापर्यंत खेळलेल्या 149 सामन्यांमध्ये 33.98 च्या सरासरीने आणि 5.42 च्या इकॉनॉमीने या विकेट घेतल्या आहेत.

दरम्यान, डॅनियल व्हिटोरी, काइल मिल्स, ख्रिस हॅरिस आणि ख्रिस केर्न्स यांसारख्या दिग्गज गोलंदाजांच्या यादीत टीम साऊदीचा समावेश झाला आहे. माजी कर्णधार व्हिटोरी न्यूझीलंडकडून (New Zealand) 297 विकेट्ससह वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.

न्यूझीलंडकडून सर्वाधिक एकदिवसीय विकेट घेणारा गोलंदाज

  • डॅनियल व्हिटोरी - 297

  • काइल मिल्स - 240

  • ख्रिस हॅरिस - 203

  • ख्रिस केर्न्स - 200

  • टिम साऊदी - 200*

तसेच, साऊदीने आज आणखी काही विकेट्स घेतल्यास, तो या यादीत एक-दोन अंकानी झेप घेऊ शकेल. त्याला ख्रिस केर्न्सला मागे टाकण्यासाठी 1 विकेट्सची गरज आहे.

दुसरीकडे, भारतीय डावाबद्दल बोलायचे झाल्यास, नाणेफेक हारुन प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिखर धवन (72) आणि शुभमन गिल (50) या सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली. मात्र, लॉकी फर्ग्युसनने गिलला बाद करुन न्यूझीलंडला पहिले यश मिळवून दिले. यानंतर साऊदीने धवनला आपली शिकार बनवले. त्यानंतर लॉकीने ऋषभ पंत (15) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) (4) यांना त्याच षटकात 33 व्या षटकात परतवून न्यूझीलंडला सामन्यात परत आणले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: गोकुळाष्टमीच्या निमित्त जय श्रीराम अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमातेची पूजा

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT