NZ vs IND 1st ODI, Live Streaming: केव्हा अन् कुठे होणार पहिली वनडे, घ्या जाणून

भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेतील पहिला सामना 25 नोव्हेंबर रोजी खेळायचा आहे.
Kane Williamson and Shikhar Dhawan| IND vs NZ
Kane Williamson and Shikhar Dhawan| IND vs NZDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

NZ vs IND 1st ODI, Live Streaming: भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी20 मालिका पार पडली असून आता 25 नोव्हेंबरपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे.

वनडे मालिकेपूर्वी झालेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने 1-0 अशा फरकाने विजय मिळवला होता. त्यामुळे आता भारतीय संघाच्या आत्मविश्वात वनडे मालिकेपूर्वी वाढ झाली असेल.

दरम्यान, टी20 मालिकेला पावसाच्या व्यत्ययाचा मोठा फटका बसला होता. पण, पहिल्या वनडेत (1st ODI) पावसाची शक्यता फारशी नाही. मात्र, वातावरण ढगाळ असू शकते. या वनडे मालिकेतील (ODI Series) पहिला सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा याबद्दल जाणून घेऊ.

Kane Williamson and Shikhar Dhawan| IND vs NZ
IND vs NZ: महान फलंदाज Viv Richards यांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी टीम इंडियाचा गब्बर सज्ज!

न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India), पहिला वनडे -

1. न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला वनडे सामना किती तारखेला होणार आहे?

न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला वनडे सामना 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

2. न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला वनडे सामना कोठे खेळवला जाईल?

न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला वनडे सामना इडन पार्क, ऑकलंड येथे खेळवला जाणार आहे.

3. न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला वनडे सामना किती वाजता खेळवला जाईल?

न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला वनडे सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 7:00 वाजता खेळला जाईल.

4. न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता?

न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही डीडी स्पोर्ट्स 0.1 चॅनेलवर विनामूल्य पाहू शकता.

5. न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला वनडे सामना कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?

न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला वनडे सामना तुम्ही 'Amazon Prime Video' वर पाहू शकता.

पहिल्या वनडे सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुडा, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

वनडे मालिकेसाठीचा पूर्ण भारतीय संघ:

शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, ऋषभ पंत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

NZ ODI Squad vs India
IND vs SL ODI match venue change
IND vs WI ODI Live Streaming
IND vs WI Rohit Sharma Virat Kohli Records
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com