Tilak Varma 
क्रीडा

Tilak Varma: 26 चेंडूत फिफ्टी ठोकताच आई-बाबांचा टॅट्यू दाखवत तिलकचं अनोखं सेलिब्रेशन, पाहा Video

Indian Cricket Team: आशियाई क्रीडा स्पर्धेत सेमीफायनलमध्ये तिलक वर्माने भारतीय क्रिकेट संघाकडून अर्धशतक ठोकल्यानंतर खास सेलिब्रेशन केले होते.

Pranali Kodre

Tilak Varma show his parents' tattoos after Fifty during Asian Games semifinal between India vs Bangladesh:

चीनमध्ये सुरू असलेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट खेळात भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशविरुद्ध उपांत्य सामन्यात 9 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने अंतिम सामन्यात प्रवेश करत पदक निश्चित केले.

भारतीय संघासाठी या सामन्यात तिलक वर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली. दरम्यान, असे असले तरी त्याच्या सेलिब्रेशनची जोरदार चर्चा झाली.

या सामन्यात बांगलादेशने भारतासमोर 97 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून तिलकने 26 चेंडूत 55 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याने ही खेळी करताना 25 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले होते.

यावेळी जेव्हा तिलकने 8 व्या षटकात षटकारासह त्याचे अर्धशतक पूर्ण केले, तेव्हा त्याने सेलिब्रेशन करताना त्याचा जर्सी वर करत त्याच्या पोटाजवळ काढलेल्या त्याच्या आई-वडिलांचा टॅट्यूकडे इशारा केला. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

तिलकने सामन्यानंतर त्याच्या सेलिब्रेशनबद्दल खुलासाही केला आहे. त्याने सांगितले की त्याने हे सेलिब्रेशन त्याच्या आईसाठी होते. तसेच त्यात त्याची बेस्ट फ्रेंड समायराचाही समावेश होता.

दरम्यान, समायरा ही भारतीय संघाचा आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची साडेचार वर्षांची मुलगी आहे. तिच्याबरोबर आयपीएलदरम्यान तिलकची चांगली गट्टी जमली आहे. तिलक आणि रोहित मुंबई इंडियन्सकडून एकत्र खेळतात. तसेच तिलकने काही महिन्यांपूर्वी वेस्ट इंडिज दौऱ्यात पहिले अर्धशतक झळकावल्यानंतर ते समायराला समर्पित केले होते.

दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास 97 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने यशस्वी जयस्वालची विकेट पहिल्याच षटकात गमावली होती. पण नंतर तिलक आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी आक्रमक खेळताना भारताला 9.2 षटकातच विजय मिळवून दिला. ऋतुराजने 40 धावांची नाबाद खेळी केली.

तत्पूर्वी बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 96 धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून सलामीवीर परवेझ हुसैन इमॉनने 23 धावांची खेळी केली. तसेच जाकर अलीने सर्वाधिक 24 धावा केल्या, तर रिकूबल हसनने 14 धावा केल्या. या तिघांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. 

भारताकडून आर साई किशोरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरने 2 विकेट्स घेतल्या. तसेच अर्शदीप सिंग, तिलक वर्मा, रवी बिश्नोई आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT