Asian Games: टीम इंडिया दिमाखात फायनलमध्ये! क्रिकेटमधील दुसऱ्या 'गोल्ड'पासून केवळ एक पाऊल दूर

Indian Cricket team: सेमीफायनलमध्ये गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर तिलक-ऋतुराजच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने विजय मिळवत आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट खेळात फायनलमध्ये धडक मारली आहे.
Tilak Varma | Ruturaj Gaikwad
Tilak Varma | Ruturaj GaikwadDainik Gomantak
Published on
Updated on

India men's Cricket Team enter into the final at 19th Asian Games Hangzhou:

चीनमध्ये सुरु असलेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाने आपली विजयी लय कायम ठेवत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. भारतीय संघाने शुक्रवारी (6 ऑक्टोबर) उपांत्य फेरीत बांगलादेश क्रिकेट संघाला 9 विकेट्सने पराभूत केले. यासह भारतीय संघाने पदक निश्चित केले आहे.

आता भारतीय संघ शनिवारी अंतिम सामना खेळेल. अंतिम सामन्यात जर विजय मिळवला तर भारतीय संघ सुवर्णपदकाला गवसणी घालेल; जर असे झाले, तर हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे दुसरे सुवर्ण पदक असेल. यापूर्वी काही दिवसांपूर्वीच भारताच्या महिला क्रिकेट संघानेही सुवर्ण पदक जिंकले आहे.

Tilak Varma | Ruturaj Gaikwad
Asian Games Cricket: भारतीय महिलांनी जिंकलं ऐतिहासिक सुवर्ण पदक! फायनलमध्ये श्रीलंका पराभूत

उपांत्य सामन्यात भारताचा विजय

दरम्यान, शुक्रवारी झालेल्या उपांत्य सामन्यात बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी 97 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 9.2 षटकातच 1 विकेट गमावत पूर्ण केला.

97 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लवकर बसला होता. यशस्वी जयस्वाल पहिल्याच षटकात शुन्यावर रिपन मंडोलच्या गोलंदाजीविरुद्ध बाद झाला होता.

मात्र यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा यांनी आक्रमक पवित्रा स्विकारत फटकेबाजी केली. या दोघांनी चौकार षटकारांची बरसात करत १० षटकांच्या आतच भारताचा विजय निश्चित केला.

तिलक 26 चेंडूत 55 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 6 षटकार मारले. तसेच ऋतुराज गायकवाडने 26 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 40 धावा केल्या.

Tilak Varma | Ruturaj Gaikwad
Asian Games मध्ये चीनची मनमानी? नीरज-ज्योतीसह भारतीय खेळाडूंविरुद्ध झाला अन्याय

तत्पुर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकत बांगलादेशला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले होते. मात्र, वॉशिंग्टन सुंदर आणि आर साई किशोर यांनी बांगलादेशच्या फलंदाजीला खिंडार पाडले. या दोघांनीही त्यांच्या वरच्या आणि मधल्या फळीतील फलंदाजांना स्वस्तात बाद केले.

त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी खालच्या फळीलाही फार काळ टिकू दिले नाही. बांगलादेशकडून सलामीवीर परवेझ हुसैन इमॉनने 23 धावांची खेळी केली. तसेच जाकर अलीने सर्वाधिक 24 धावा केल्या, तर रिकूबल हसनने 14 धावा केल्या. या तिघांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. बाकी खेळाडू 10 धावांचा टप्पाही पार करू शकले नाहीत. त्यामुळे बांगलादेशला 20 षटकात 9 बाद 96 धावाच करता आल्या.

भारताकडून आर साई किशोरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरने 2 विकेट्स घेतल्या. तसेच अर्शदीप सिंग, तिलक वर्मा, रवी बिश्नोई आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com