Asian Games: पत्नीनं गोल्ड जिंकलं अन् सुंदरने व्हिडिओ पाठवला, दिनेश कार्तिकचा आनंद गगनात मावेना

Dipika Pallikal and Harinder Pal Sandhu: आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॅशमध्ये दीपिका पल्लिकल आणि हरिंदर पाल संधू यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
Dinesh Karthik | Dipika Pallikal | Harinder Pal Sandhu
Dinesh Karthik | Dipika Pallikal | Harinder Pal Sandhu Dainik Gomantak
Published on
Updated on

Dinesh Karthik congratulate Dipika Pallikal and Harinder Pal Sandhu for Gold medal in 19th Asian Games Hangzhou:

चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत गुरुवारी स्क्वॅश खेळात भारताचा मोठे यश मिळाले आहे. भारताला गुरुवारी स्कॅशमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक मिळाले. त्यानंतर भारताचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने शेअर केलेला व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

गुरुवारी स्क्वॅशमध्ये दीपिका पल्लिकल आणि हरिंदर पाल संधू यांच्या जोडीने मिश्र दुहेरीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. त्यांनी अंतिम सामन्यात मलेशियाच्या अझमन ऐफा बिनती आणि बिन मोहम्मद कमाल मोहम्मद स्याफिक या जोडीला पराभूत केले.

हे स्क्वॅशमध्ये मिश्र दुहेरीतील भारताचे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील पहिलेच सुवर्ण पदक आहे. दरम्यान, दीपिका ही दिनेश कार्तिकची पत्नी आहे. त्यामुळे तिने सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला आहे.

Dinesh Karthik | Dipika Pallikal | Harinder Pal Sandhu
Asian Games मध्ये चीनची मनमानी? नीरज-ज्योतीसह भारतीय खेळाडूंविरुद्ध झाला अन्याय

तसेच दिनेशने दीपिका आणि हरिंदर यांनी सुवर्ण पदक जिंकल्यानंतर दिनेशने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात भारताने सुवर्ण पदक जिंकल्याचा क्षण दिसत आहे. तसेच दीपिका आणि हरिंदर त्यांच्या विजयाचे सेलिब्रेशन करताना दिसत आहे.

या व्हिडिओ शेअर करताना दिनेशने दीपिका आणि हरिंदरचे अभिनंदन केले आहे. याबरोबरच त्याने त्याच्या पोस्टमध्ये हा व्हिडिओ भारतीय क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदरने त्याला पाठवल्याचे सांगितले आहे. सुंदर आणि कार्तिक हे चांगले मित्र देखील आहेत.

सुंदर सध्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय क्रिकेट संघाचा भाग आहे. त्यामुळे तो देखील चीनमध्ये आहे. सुंदरसह क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी देखील दीपिका आणि हरिंदर यांचा अंतिम सामना पाहाण्यासाठी उपस्थित होता.

त्यामुळे दिनेशने त्याच्या पत्नीला अंतिम सामन्यासाठी पाठिंबा देण्यासाठी वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल त्रिपाठी यांचे आभारही मानले आहेत. तसेच त्याला तिथे उपस्थित राहणे शक्य झाले नसल्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे.

Dinesh Karthik | Dipika Pallikal | Harinder Pal Sandhu
Asian Games: भारतासाठी 11 वा दिवस ऐतिहासिक! पहिल्यांदाच पार केला 'इतक्या' पदकांचा आकडा

दरम्यान, दीपिका आणि हरिंदर यांचे हे दुसरे पदक आहे. याआधी दीपिकाने भारतीय महिला संघासह सांघिक प्रकारात कांस्य पदक जिंकले आहे, तर हरिंदरने भारतीय पुरुष संघासह सुवर्ण पदक जिंकले आहे.

त्याचबरोबर लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की दीपिकाने काही काळाच्या ब्रेकनंतर पुन्हा पुनरागमन करत अद्यापही ती उच्च स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज असल्याचे सिद्ध केले आहे. गेल्यावर्षी दीपिका आणि दिनेश यांनी त्यांच्या जुळ्या मुलांचे स्वागत केले आहे. त्याचमुळे काही काळ दीपिका खेळापासून दूर होती.

सौरव घोषालला रौप्य पदक

दरम्यान, गुरुवारी स्क्वॅशमध्ये पुरुषांच्या एकेरी प्रकारात भारताच्या सौरव घोषालला रौप्यपदक मिळाले. त्याला अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का बसल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com