I-League Football Dainik Gomantak
क्रीडा

I-League Football: ‘ट्राऊ’ने पिछाडीवरून चर्चिल ब्रदर्सला नमविले

विजयासह इंफाळ येथील संघ आता तिसऱ्या क्रमांकावर

किशोर पेटकर

I-League Football: आय-लीग सामन्यात दोन वेळा पिछाडीवर पडूनही टिड्डिम रोड ॲथलेटिक युनियन (ट्राऊ) संघाने माजी विजेत्या गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सला 3-2 असे नमविले. या कामगिरीसह इंफाळ-मणिपूर येथील संघ आता गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानी आला आहे.

सामना इंफाळ येथील खुमान लाम्पाक स्टेडियमवर झाला. ट्राऊ संघाच्या सलाम रंजन सिंग याने 38व्या मिनिटास स्वयंगोल केल्यामुळे चर्चिल ब्रदर्सला पूर्वार्धात आघाडी मिळाली. बदली खेळाडू बिल्लू तेली याने 57व्या मिनिटास यजमान संघास १-१ अशी बरोबरी साधून दिली.

66व्या मिनिटास बदली खेळाडू कपिल होबळे याने रिबाऊंडवर केलेल्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सला 2-1 अशी आघाडी मिळाली, पण ती जास्त काळ राहिली नाही. 67व्या मिनिटास कोमरॉन तुर्सूनोव्ह याच्या गोलमुळे ट्राऊ संघाने 2-2 अशी बरोबरी साधली.

चर्चिल ब्रदर्सचा बचावपटू पोनिफ वाझ याने गोलक्षेत्रात चेंडू हाताळल्यामुळे ट्राऊ संघाला पेनल्टी फटका मिळाला. 78व्या मिनिटास फर्नांडिन्हो याने अचूक नेम साधत ट्राऊ संघाला 3-2 असे महत्त्वपूर्ण वर्चस्व मिळवून दिले.

ट्राऊ संघाचा हा 16 सामन्यांतील आठवा विजय असून 26 गुणांसह त्यांना गुणतक्त्यात तिसऱ्या क्रमांकापर्यंत प्रगती साधता आली. चर्चिल ब्रदर्सला सहावा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे 17 लढतीनंतर 23 गुणांसह त्यांची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली.

पराभवाची सव्याज परतफेड

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात वास्को येथे 20 डिसेंबर रोजी चर्चिल ब्रदर्सने ट्राऊ संघाचा 6-1 असा धुव्वा उडविला होता. त्या पराभवाची सव्याज परतफेड ट्राऊ संघाने शुक्रवारी घरच्या मैदानावर केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli World Record: विराट कोहलीची अवघ्या 7 धावांची खेळी, पण रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम मोडला! न्यूझीलंडविरुद्ध बनला नंबर 1 फलंदाज

VIDEO: डिचोलीत भीषण अपघात; जिममधून घरी परतताना दुचाकीवरील नियंत्रण सुटलं, 22 वर्षीय तन्मयचा उपचारादरम्यान मृत्यू

Goa Pollution Control Board: धारबांदोड्यातील हॉटमिक्स प्रकल्प सुरू करण्यास मनाई, उच्च न्यायालयाचा दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीला आव्हान

Women’s T20: श्रेया परबची नाबाद 52 धावांची झुंज व्यर्थ; महाराष्ट्राने गोव्याला 12 धावांनी नमवले

Viral Video: मोबाईल ठेवायला जागा नाही म्हणून थेट चाकू बाहेर काढला! ट्रेनमधील तरुणाच्या कृत्याने प्रवासी संतप्त, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT