Margao Crime : ख्रिसमस दिवशी गोव्यात झाला खून, तब्बल चार वर्षांनी दिल्लीच्या कामगाराला झाली जन्मठेप

एका कर्नाटकी कामगाराच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता
Accused Omprakash Chand
Accused Omprakash ChandDainik Gomantak

Margao Crime : संपुर्ण गोवा ख्रिसमस साजरे करण्यास मग्न असताना चार वर्षांपूर्वी मडगाव बस स्थानकावर दारूच्या नशेत भांडण उरकून काढून शिवप्पा नावाच्या एका कर्नाटकी कामगाराच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्याच्या आरोपाखाली ओमप्रकाश चंद याला दोषी ठरवण्यात आले होते.

आज झालेल्या सुनावणीत दक्षिण गोव्याच्या अतिरीक्त सत्र न्यायाधीश पूजा कवळेकर यांनी ओमप्रकाश चंद याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपीला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठवण्यात आला आहे.

Accused Omprakash Chand
Goa Crime: मुंबईच्या मुलीवर सांगेत बलात्कार, तर पेडणेतही तरुणीवर अत्याचार

आज झालेल्या सुनावणीत ओमप्रकाश याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसेच 50 हजार रुपयांचा दंडही ठोठवण्यात आला असून हा दंड भरल्यास ती रक्कम मृताच्या नातेवाईकांना देण्यात यावी असे न्यायालयाने म्हटले असून ती न भरल्यास 1 वर्षाची अतिरीक्त सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

25 डिसेंबर 2018 रोजी दुपारी आरोपीने खून केल्याची घटना घडली होती. खून केल्यावर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, फातोर्डा पोलीस स्थानकाचे तत्कालिन पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध घेतला.

Accused Omprakash Chand
Nagesh Karmali: स्वातंत्र्यसैनिक करमली अनंतात विलीन; विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आदरांजली

देसाई हे फातोर्डा पोलीस स्थानकाचे निरीक्षक असताना तीन खून झाले होते. या तिन्ही खुनाचा त्यांनी यशस्वीरित्या तपास करीत तिघांनाही जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत पोहोचविले होते. या प्रकरणाची सरकारी बाजू अभियोक्ता देवानंद कोरगावकर यांनी मांडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com