प्रशिक्षक बदलाबाबत चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही कपिल देव यांचे मत Dainik gomantak
क्रीडा

प्रशिक्षक बदलाच्या चर्चांची ही वेळ योग्य नाही

रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यावर राहुल द्रविड यांचा विचार केला जाऊ शकतो. असे मत कपिल देव यांनी व्यक्त केले आहे. राहुल द्रविड सध्या श्रीलंका दौऱ्यावर मुख्या प्रशिक्षक म्हणून आहेत.

दैनिक गोमन्तक

भारतीय (Indian team) संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली आणि रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने अनेक मालिकेत विजय संपादन केले आहेत. या जोडीला अजून आयसीसीची (ICC) ट्रॅफी जिंकण्यात अद्याप यश आलेले नाही.(This is not the time for coach change discussions)

जागतिक कसोटी स्पर्धेत अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Head Coach Ravi Shastri) आणि कर्णधार विराट कोहली (Captain Virat Kohli) यांना त्यांच्या पदावरुन कमी करावे अशी मागणी होत आहे. परंतु याबाबत भारताचा माजी कर्णधार कपिल देव (Former captain Kapil Dev) यांनी आपले मत मांडले आहे.

ते म्हणाले, मला वाटत नाही याबाबत आताच चर्चा करण्याची ही वेळ नाही. आधी श्रीलंकेत गेलेल्या संघाची कामगिरी कशी होते ते पहावे लागेल. नवीन प्रशिक्षक निवडणे यात काहीच चूक नाही. परंतु रवी शास्त्री जर चांगली कामगिरी करत असतील तर त्यांना हटविण्याचा प्रश्नच येत नाही. अशा गोष्टींमुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांवर दबाव निर्माण होतो. रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यावर राहुल द्रविड यांचा विचार केला जाऊ शकतो. राहुल द्रविड सध्या श्रीलंका दौऱ्यावर मुख्या प्रशिक्षक म्हणून आहेत.

रवी शास्त्री यांच्या मार्गदशनाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात 2 वेळा कसोटी मालिका जिंकली आहे. 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली आहे. भारताचा एक इंग्लंड विरोधात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. तर दुसरा संघ श्रीलंकेत 13 जुलैपासून वनडे, टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT