Oman Cricket Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023 Qualifiers: क्रिकेट भारतीयांच्या रक्तातच! जन्माने भारतीय असलेले 'हे' क्रिकेटर गाजवताहेत आखाती देशाचे मैदान

Oman Cricket: भारतात जन्मलेले हे क्रिकेटर्स कर्मभूमी ओमानसाठी गाजवतायेत मैदान

Pranali Kodre

Indian Born Cricketers like Ayaan Khan, Kashyap Prajapati playing for Oman in ICC Cricket World Cup Qualifiers 2023:

वर्ल्डकप 2023 क्वालिफायर स्पर्धा सध्या झिम्बाब्वेमध्ये सुरू आहे. या स्पर्धेत काही क्रिकेटपटूंनी प्रभावी कामगिरी केली आहे. यात ओमान संघातील खेळाडूंचाही समावेश आहे. ओमानचे या स्पर्धेतील आव्हान संपले असले, तरी या संघातील काही खेळाडूंनी आपल्याकडे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे ओमान संघातील जवळपास अर्धे खेळाडू भारतीय वंशाचे आहेत.

या स्पर्धेत ओमान संघात समावेश अससेले कश्यप प्रजापती, अयान खान, जतिंदर सिंग, जय ओडेद्रा, संदीप गौड, सुरज कुमार या खेळाडूंचा जन्म भारतातील आहे. पण वेगवेगळ्या कारणांनी ओमानमध्ये स्थायिक झाल्याने हे खेळाडू ओमान संघाकडून खेळत आहेत.

बऱ्याचदा भारतात जन्मलेले खेळाडू इथे फारशी संधी न मिळाल्याने दुसऱ्या संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतात. अयान खान हा देखील याचेच उदाहरण आहे. तो मध्य प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळला होता. पण त्याला फारशी संधी मिळाली नाही, त्यानंतर तो ओमानला स्थायिक झाला.

उन्मुक्त चंद याने देखील याच कारणाने अमेरिकेत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे उन्मुक्त चंदच्या नेतृत्वात भारताने 2012 साली 19 वर्षीय वर्ल्डकप जिंकला होता.

भारतात कुठे झालाय जन्म?

सध्या ओमान संघात असलेल्या कश्यप प्रजापतीचा जन्म गुजरातमधील खेडा येथे झाला आहे. तर अयान खान मुळचा भोपाळचा आहे. जतिंदर आणि सुरज कुमार पंजाबचे आहेत. तसेच जय सौराष्ट्राचा आहे, तर संदीप हैदराबादचा आहे.

ओमानसाठी शतकेही ठोकलीत

ओमानसाठी वनडेत आत्तापर्यंत 6 खेळाडूंनीच शतके केली आहेत. यामध्ये तीन भारतीय वंशाच्या खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये कश्यप प्रजापती, अयान खान, जतिंदर सिंग या तिघांचा समावेश आहे.

यातील प्रजापती आणि अयान यांनी नुकतेच वर्ल्डकप 2023 क्वालिफायर स्पर्धेत शतके ठोकली आहेत. अयानने नेदरलँड्सविरुद्ध पहिले वनडे शतक ठोकले, तर प्रजापतीने झिम्बाब्वेविरुद्ध त्याच्या वनडे कारकिर्दीतील दुसरे शतक ठोकले. याशिवाय जतिंदर ओमानकडून सर्वाधिक वनडे शतके करणारा खेळाडू आहे. त्याने ओमानकडून सर्वाधिक ३ शतके ठोकली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT