सामन्यानंतर जडेजाने (Ravindra Jadeja) पत्रकारांशी संवाद साधला.
सामन्यानंतर जडेजाने (Ravindra Jadeja) पत्रकारांशी संवाद साधला. Dainik Gomantak
क्रीडा

ICC T20 World Cup: ...तर आम्ही बॅग पॅक करुन घरी जाऊ; जडेजाचे मिश्कील उत्तर

दैनिक गोमन्तक

भारताने (India) स्कॉटलंडविरुद्ध (Scotland) शानदार विजय नोंदवला आणि गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले. आता उपांत्य फेरी गाठण्याच्या भारताच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता जर अफगाणिस्तानच्या (Afghanistan) संघाने न्यूझीलंडला (New Zealand) हरवले आणि भारताने नामिबियाकडून मोठ्या फरकाने सामना जिंकला तर भारत उपांत्य फेरीत दाखल होऊ शकतो. मात्र, न्यूझीलंडने विजय मिळवला तर भारताचा प्रवास तेथेच संपुष्टात येईल. अशा परिस्थितीत अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचवेळी स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) 3 विकेट घेतल्या आणि त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. सामन्यानंतर जडेजाने पत्रकारांशी संवाद साधला.

त्यावेळी पत्रकारांशी बोलताना एकाने विचारले, न्यूझीलंडने अफगाणिस्तानला हरवले तर काय होईल? यावर जडेजाने मजेशीर उत्तर दिले ज्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आले. जडेजा म्हणाला, 'मग बॅग पॅक करून आम्ही घरी जाऊ आणि काय..' जडेजाचे हे मिश्कील उत्तर सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

स्कॉटलंडविरुद्ध भारताच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. स्कॉटलंडचा संघ 85 धावांत आटोपला, त्यात जडेजा आणि मोहम्मद शमीने 3 प्रत्येकी विकेट्स घेतल्या. याशिवाय जसप्रीत बुमराही विकेट घेण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर भारताने 39 चेंडूत लक्ष्य हे गाठले. भारताकडून रोहित शर्माने 30 आणि केएल राहुलने 50 धावा केल्या. दोन्ही फलंदाज बाद झाले पण कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी हे लक्ष्य 6.3 षटकांत पूर्ण केले. सूर्यकुमारने षटकार ठोकून भारताला 8 विकेटने विजय मिळवून दिला. आता भारतीय संघाचा पुढील सामना 8 नोव्हेंबरला नामिबियाशी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: गोव्यात सकाळी नऊपर्यंत 13.02 टक्के मतदान

Lok Sabha Election 2024: ''लोकसभा निवडणुकीनंतर ओबीसींच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावणार''; CM सावंत यांची ग्वाही

Lok Sabha Election 2024: तिसवाडीत एक लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क; खिस्ती मते ठरणार निर्णायक

Congress Leader Shashi Tharoor: ‘व्‍यक्तिस्‍वातंत्र्य’ अबाधित राहावे; शशी थरूर यांनी लेखक, विचारवंतांशी मडगावात साधला संवाद

Lok Sabha Election 2024: दक्षिण गोव्यात आज विक्रमी मतदानाची शक्यता; विरियातो अन् पल्लवी यांच्यात निकराची लढाई

SCROLL FOR NEXT