न्यूझीलंडला अफगाणिस्तानने पराभूत करु दे रे देवा ! 'काळजी करु नका': रशिद खान

सध्या सुरु असलेल्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) स्कॉटलंडविरुद्ध दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा पल्लवीत केल्या आहेत.
Rashid Khan
Rashid KhanDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सध्या सुरु असलेल्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) स्कॉटलंडविरुद्ध (Scotland) दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने (Indian Team) उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. भारताने स्कॉटिश गोलंदाजांना गारद करत रनरेटची समस्याही संपविली. रनरेटच्या बाबतीत भारताने पाकिस्तान (Pakistan), न्यूझीलंड (New Zealand) आणि अफगाणिस्तान या तिन्ही संघांना मागे टाकले आहे. आता अफगाणिस्तानचा संघ पुढच्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करु दे रे देवा म्हणत भारतीय क्रिकेट चाहते प्रार्थना करु लागले आहेत. सध्या भारताचा धावगती +1.619 आहे.

अबुधाबीमध्ये 7 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना रंगणार आहे. मात्र आतापासूनच हा सामना ट्विटरवर (#AfgvsNZ) ट्रेंड करु लागला आहे. अफगाण नागरिक या सामन्याची वाट पाहत नसतील त्यापेक्षा जास्त भारतीय वाट पाहत आहेत. ट्विटरवर एका वापरकर्त्याने लता मंगेशकर यांनी गायलेल्या "एक तू ही भरोसा, एक तू ही सहारा" या गाण्याच्या व्हिडिओसोबत लिहिले की, "नोव्ह 7" आणि हात जोडणारे चिन्ह वापरले आहे.

Rashid Khan
T20 World Cup 2021: KL राहुलचे विक्रमी अर्धशतक पाहून गर्लफ्रेंड अथिया ‘घायल’

आता या विश्वचषकात भारताला उपांत्य फेरी गाठायची असेल तर अफगाणिस्तानचा विजय हाच एकमेव मार्ग आहे. आणि अफगाणिस्तानच्या विजयासाठी भारतीय लोक देवाकडे प्रार्थना करु लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com