ATK Mohan Bagan
ATK Mohan Bagan  Dainik Gomantak
क्रीडा

एटीके मोहन बागानची प्रतीक्षा लांबली, ओडिशाची अखेर बरोबरी

दैनिक गोमन्तक

पणजी ः पेनल्टी फटका वाया गेल्यामुळे ओडिशा एफसीला आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेत गुरुवारी धक्कादायक विजय नोंदविता आला नाही, तर बरोबरीमुळे एटीके मोहन बागानची स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी प्रतीक्षा लांबली.

वास्को येथील टिळक मैदानावर झालेला सामना नाट्यमय ठरला व 1-1 असा गोलबरोबरीत राहिला. भरपाई वेळेत एटीके मोहन बागानचा बदली खेळाडू रॉय कृष्णा याला सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे रेड कार्डसह मैदान सोडावे लागले. दहा खेळाडूंसह भरपाई वेळेत खेळताना कोलकात्याच्या संघाने ओडिशाला (Odisha) वरचढ होऊ दिले नाही. त्यापूर्वी 89व्या मिनिटास लिरिडॉन क्रास्निकी याचा प्रयत्न क्रॉसबारला आपटल्यामुळे भुवनेश्वरचा संघ आघाडीपासून दूर राहिला.

रेडीम ट्लांग याने मोसमातील पहिलाच गोल नोंदवत ओडिशा एफसीला पाचव्या मिनिटास आघाडी मिळवून दिली, पण ती अल्पायुषी ठरली. आठव्या मिनिटास फिनलंडच्या जॉनी कौको याच्या शानदार पेनल्टी गोलमुळे एटीके मोहन बागानने बरोबरी साधली. ओडिशाला पेनल्टी फटका मिळाला, पण त्यांचा स्पॅनिश खेळाडू हावी हर्नांडेझ अचूक नेम साधू शकला नाही, त्याचे श्रेय एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अमरिंदर सिंगलाही जाते. 24व्या मिनिटास या अनुभवी गोलरक्षकाने फटक्याचा अचूक अंदाज बांधत डावीकडे झेपावत चेंडू रोखला आणि नंतर रिबाऊंडवर ओडिशाला लाभ मिळणार नाही याची दक्षता घेतली.

एटीके मोहन बागान तिसऱ्या स्थानी

एटीके मोहन बागानने सलग 13 सामने अपराजित (6 विजय, 7 बरोबरी) राहण्याची किमया साधली. त्यांची ही सलग दुसरी, तर एकंदरीत सातवी बरोबरी ठरली. त्यामुळे 17 लढतीनंतर त्यांना 31 गुणांसह तिसरे स्थान मिळाले आहे. समान गुणांत सरस गोलसरासरीमुळे जमशेदपूर एफसी संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओडिशाचे आव्हान साखळी फेरीतच संपणार हे गुरुवारी निश्चित झाले. पाचव्या बरोबरीनंतर त्यांचे 19 लढतीनंतर 23 गुण झाले असून सातवा क्रमांक कायम राहिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED ची गोव्यात मोठी कारवाई! चौगुले उद्योग समूहाच्या सात ठिकाणांवर छापे, कागदपत्रे जप्त

Gallantry Awards: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शूरवीरांना किर्ती अन् शौर्य चक्र प्रदान

Goa: आई स्वयंपाकात व्यस्त असताना चिमुकलीचा वीज तारेशी संपर्क आला, झारखंडच्या मजुर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

Panjim News: अग्निशमनच्या नागपुरातील अधिकाऱ्यांना गोव्यात प्रशिक्षण

Harvalem Caves And Waterfall: इतिहास आणि निसर्गाची आवड आहे? मग हरवळेतील धबधबा आणि पांडवकालीन गुहा नक्की पाहा

SCROLL FOR NEXT