Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND VS WI: भारताने वेस्ट इंडिजचा केला क्लीन स्वीप, तिसरी वनडेही 96 धावांनी जिंकली

भारतीय संघाने (IndianTeam) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs West Indies, 3rd ODI) शानदार कामगिरी करत वेस्ट इंडिजचा पराभव केला.

दैनिक गोमन्तक

भारतीय संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs West Indies, 3rd ODI) शानदार कामगिरी करत वेस्ट इंडिजचा पराभव केला. सलग तिसऱ्या विजयासह भारतीय संघाने विंडीजचा क्लीन स्वीप केला. टीम इंडियाने (Team India) तिसऱ्या वनडेत 96 धावांनी विजय मिळवला. भारताच्या विजयात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांनी शानदार अर्धशतके झळकावली. गोलंदाजीत दीपक चहर, मोहम्मद सिराज, प्रशांत कृष्णा आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनी चमकदार कामगिरी केली. वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरनने 34 आणि ओडिन स्मिथने 36 धावा केल्या. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर वेस्टइंडिजचे फलंदाज धराशाही झाली. (The Indian Team Defeated The West Indies In The Third ODI)

दरम्यान, भारताकडून फलंदाजीत श्रेयस अय्यरने सर्वाधिक 80 धावांचे योगदान दिले. ऋषभ पंतनेही 56 धावांची खेळी केली. दोन्ही फलंदाजांमध्ये 110 धावांची भागीदारी झाली. यानंतर मधल्या फळीत दीपक चहरने 38 आणि वॉशिंग्टन सुंदरने 33 धावांचे योगदान दिले. दोन्ही फलंदाजांनी 8व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.

भारताची टॉप ऑर्डर अपयशी ठरली

कर्णधार रोहित शर्माने नाणे जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टीचा आधार घेत विंडीजच्या गोलंदाजांनी भारतीय खेळाडूंना नाकीनऊ आणले. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बाद करुन अल्झारी जोसेफने टीम इंडियाला मोठा धक्का दिला. विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. यानंतर शिखर धवनला ओडिन स्मिथने बाद केले आणि भारताने अवघ्या 42 धावांत 3 विकेट गमावल्या. यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला श्रेयस अय्यर आणि यष्टिरक्षक ऋषभ पंत यांनी संघाची धुरा सांभाळली. पंत त्याच्याच शैलीत खेळला आणि अय्यरने जोरदार फलंदाजी केली. दोघांनी शानदार शॉट्स खेळले. यामध्ये अय्यरला पंतची साथ लाभली. दोन्ही फलंदाजांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली. त्यानंतर अय्यर-पंत यांच्यात शतकी भागीदारीही झाली.

तसेच, पंत आणि अय्यरला वॉल्शने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा अडचणीत आली. ऑफ-स्टंपच्या जवळून कट खेळण्याच्या प्रयत्नात पंतने पाठीमागे यष्टिरक्षकाला झेल दिला. तर अय्यरने एक्स्ट्रा कव्हरवर लांब शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र लाँग-ऑफवर झेल गेला. दरम्यान, फॅबियन ऍलनने सूर्यकुमार यादवला वैयक्तिक ६ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. टीम इंडियाने 187 रन्सवर 6 विकेट गमावल्याने अडचणीत आले होते. परंतु यानंतर दीपक चहर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी शानदार फटकेबाजी करत भारतीय संघाला 260 च्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

वेस्ट इंडिजची खराब फलंदाजी

वेस्ट इंडिजनेही 266 धावांचे लक्ष्य पार केले. मात्र त्यांच्याकडून आघाडीच्या फळीतील 5 पैकी 4 फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. यष्टिरक्षक शे होपला सिराजने 5 धावांवर आऊट झाला. ब्रँडन किंग आणि शेमाराह ब्रूक्स यांना दीपक चहरने एकाच षटकात आऊट केले. यानंतर प्रसिद्ध कृष्णाने डॅरेन ब्राव्होची विकेट घेतली. निकोलस पूरनने संघाला तारण्याचा विफल प्रयत्न केला मात्र त्याला विकेट टिकवता आली नाही. कुलदीपने विंडीजचा कर्णधार निकोलस पूरनलाही 34 धावांवर बाद केले. वेस्ट इंडिजने अवघ्या 18.3 षटकांत 7 विकेट गमावल्या. मात्र, यानंतर ओडिन स्मिथने फलंदाजी करताना 18 चेंडूत 36 धावा करता आल्या नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT