Indian team 

 

Dainik Gomantak 

क्रीडा

U-19 Asia Cup: भारताच्या युवा स्टार्सचा शानदार विजय, उपांत्य फेरीत मारली धडक!

यश धुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने (indian team) अफगाणिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. या स्पर्धेतील दुसऱ्या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय संघाने अंडर-19 आशिया चषकाच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. अ गटातील त्यांच्या तिसऱ्या सामन्यात यश धुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने (indian team) अफगाणिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. या स्पर्धेतील दुसऱ्या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले आहे.

दरम्यान, पुन्हा एकदा सलामीवीर हरनूर सिंग पन्नूने (Harnoor Singh Pannu) भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला, त्याने सुरेख अर्धशतक झळकावत या सामन्यात धावांचा पाठलाग करण्याचा पाया रचला. यूएईमध्ये खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने (indian team) यापूर्वी यजमान यूएईचा पराभव केला होता, तर पाकिस्तानकडून (pakistan) पराभव स्वीकारावा लागला होता.

दुबईतील आयसीसी अकादमीमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत सोमवारी 27 डिसेंबर रोजी भारत आणि अफगाणिस्तान (Afghanistan) आमनेसामने होते. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने चांगली सुरुवात केली. अफगाणिस्तानच्या डावाला लगाम घालताना उघडपणे धावा करण्याची संधीही दिली नाही. 29व्या षटकापर्यंत अफगाणिस्तानने 101 धावांवर 3 विकेट्स गमावल्या होत्या. येथून पुढे अफगाण संघाचा कर्णधार सुलीमान साफी (Suleiman Safi) आणि इजाज अहमद अहमदझाई यांनी संघाची धुरा सांभाळली. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी झाली.

इजाज आणि सुलीमान भारतासाठी घातक ठरले

सुलीमान 86 चेंडूत 73 धावा करुन बाद झाला. त्याचवेळी इजाज अहमदने अवघ्या 68 चेंडूत 86 धावा केल्या. यादरम्यान त्याने 7 षटकार आणि 1 चौकारही लगावला. इजाजशिवाय खैबर वलीनेही 12 चेंडूत 20 धावा केल्या. अफगाणिस्तानच्या डावाचे वैशिष्ट्य म्हणजे इजाज आणि खैबर यांनी शेवटच्या षटकात 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 27 धावा काढल्या, या जोरावर त्यांना 4 गडी गमावून 259 धावा करता आल्या. भारतासाठी विकी ओस्तवाल (1/35) आणि कौशल तांबे (1/28) हे भारतासाठी सर्वात प्रभावी गोलंदाज ठरले.

हरनूरची आणखी एक शानदार खेळी

प्रत्युत्तरात हरनूर सिंग आणि अंगक्रिश रघुवंशी या सलामीच्या जोडीने भारताची दमदार सुरुवात केली. दोघांनी 18 षटकांत 104 धावा काढल्या आणि संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. ही जोडी आंगक्रिशच्या (35) विकेटने तुटली. लवकरच हरनूरही अर्धशतक पूर्ण करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. हरनूरने 74 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 65 धावांची दमदार खेळी केली. हरनूरने यापूर्वी यूएईविरुद्ध शतक झळकावले होते, तर पाकिस्तानविरुद्धही त्याने चांगली धावसंख्या केली होती. हरनूरनंतर एस रशीदही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला.

तांबे-बावांची मॅच विनिंग पार्टनरशिप

संघाला झटपट धक्के बसल्यानंतर भागीदारीची गरज होती. कर्णधार यशने निशांत सिंधूसह 46 धावा काढल्या. कर्णधार यशची विकेटही 36 व्या षटकात पडली. तोपर्यंत भारताची धावसंख्या 183 धावा होती, आणि दोन षटकांनंतर आराध्य यादवचा खेळही 197 धावांवर संपला होता. येथून राज बावा आणि कौशल तांबे यांनी संघासाठी चांगली भागीदारी केली. तांबेने 49 व्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर चार चौकार लगावत संघाला 4 गडी राखून नेत्रदीपक विजय मिळवून दिला. तांबे आणि बावा यांच्यात 65 धावांची नाबाद भागीदारी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT