Chetan Sharma Dainik Gomantak
क्रीडा

'या' भारतीय गोलंदाजाने न्यूझीलंडच्या फलंदाजांना गारद करत, रचला इतिहास

31 ऑक्टोबर हा दिवस विश्वचषकाच्या (World Cup) इतिहासातील खास दिवसांपैकी एक आहे.

दैनिक गोमन्तक

31 ऑक्टोबर हा दिवस विश्वचषकाच्या (World Cup) इतिहासातील खास दिवसांपैकी एक आहे. या दिवशी असे काही घडले असेल तर याची कल्पनाही आपण केली नसेल. विश्वचषकात असे पहिल्यांदाच घडले, ते वर्ष होते 1987. सध्या बीसीसीआयच्या (BCCI) निवड समितीचे प्रमुख असलेल्या चेतन शर्माने (Chetan Sharma) हा पराक्रम केला आहे. 31 ऑक्टोबर 1987 रोजी नागपुरात खेळल्या गेलेल्या सामन्यात चेतनने विश्वचषकातील पहिली हॅट्ट्रिक घेतली. न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) त्याने ही हॅटट्रिक घेतली. यासह एकदिवसीय क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा चेतन भारताचा पहिला गोलंदाज ठरला. यासह या उजव्या हाताच्या गोलंदाजाने इतिहासात आपले नाव नोंदवले.

विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (Vidarbha Cricket Association) मैदानावर भारत आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने होते. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी चेतनने सहाव्या षटकात केन रदरफोर्ड (Ken Rutherford), इयान स्मिथ (Ian Smith) आणि इवेन चॅटफिल्ड (Even Chatfield) यांना बाद करुन हॅट्ट्रिक पूर्ण केली होती. रदरफोर्ड 26 धावा करुन बाद झाला. स्मिथ आणि चॅटफिल्ड यांना खातेही उघडता आले नव्हते. या हॅट्ट्रिकमुळे न्यूझीलंडचा संघ बॅकफूटवर गेला होता. न्यूझीलंडच्या 182 धावांवर या तीन विकेट पडल्या होत्या.

भारताला महत्त्वपूर्ण विजय मिळाला

चेतनच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला निर्धारित 50 षटकांत नऊ विकेट्स गमावून 221 धावांवर रोखले. न्यूझीलंडकडून दीपक पटेलने 40 धावा केल्या. जॉन राइटने 35 धावा केल्या. भारताकडून चेतनने तीन बळी घेतले. मनोज प्रभाकर, मोहम्मद अझरुद्दीन, मनिंदर सिंग आणि रवी शास्त्री यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. भारताला गटात पहिले स्थान मिळवण्यासाठी आणि उपांत्य फेरीत जाण्यासाठी ऑस्ट्रेलियाची जागा घेण्यासाठी 42.2 षटकात सामना जिंकणे आवश्यक होते. हे लक्ष्य त्यांनी केवळ 32.1 षटकांतच गाठले. भारताकडून सुनील गावस्करने नाबाद 103 धावांची खेळी केली. त्यांचा सलामीचा जोडीदार कृष्णमाचारी श्रीकांतने 58 चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 75 धावा केल्या. गावस्करने आपल्या डावात 88 चेंडूंचा सामना केला आणि 10 चौकारांसह तीन षटकार ठोकले. अझहर 51 चेंडूत 41 धावा करुन नाबाद परतला. त्याने पाच चौकार लगावले होते. मात्र, हा सामना चेतन शर्माच्या शानदार हॅट्ट्रिकमुळे लक्षात राहिला. या विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीच्या पुढे जाता आले नाही. ऑस्ट्रेलियाने हा विश्वचषक जिंकला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT