Guardian Angel Club Dainik Gomantak
क्रीडा

गार्डियन एंजल क्लबने स्पोर्टिंग क्लब द गोवा संघास बरोबरीत रोखले

गोवा प्रोफेशन लीग (Goa Profession League) फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघास मंगळवारी गोल नोंदविण्यात अपयश आले.

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा प्रोफेशन लीग (Goa Profession League) फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघास मंगळवारी गोल नोंदविण्यात अपयश आले, परिणामी गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबविरुद्ध (Guardian Angel Club) त्यांना गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

स्पोर्टिंग क्लब मंगळवारच्या निकालानंतर अपराजित राहिला, पण त्यांना बरोबरीमुळे दोन गुणांस मुकावे लागले. तीन लढतीनंतर गतविजेत्यांचे आता सलग दुसऱ्या बरोबरीनंतर पाच गुण झाले आहेत. स्पर्धेतील पहिल्या लढतीत वास्को क्लबविरुद्ध पराजित झालेल्या गार्डियन एंजलने स्पोर्टिंगविरुद्धच्या एका गुणासह गुणतक्त्यात खाते उघडले. अनुभवी मार्कुस मस्कारेन्हासच्या अनुपस्थितीत अकेराज मार्टिन्सला स्पोर्टिंगच्या आक्रमणाची धूरा वाहावी लागली, पण त्याला यश लाभले नाही. दुसरीकडे गार्डियन एंजल क्लबची आक्रमण यशस्वी थोपवून धरताना स्पोर्टिंगच्या बचावफळीने भक्कम खेळ केला. सामन्याच्या 19 व्या मिनिटास अकेराज याला गोल करण्याची चांगली संधी होती, पण फटका मारताना तो अचूक नेम साधू शकला नाही. नंतर तिसाव्या मिनिटास रियो फर्नांडिसने आणखी एक संधी गमावली. नंतर 34 व्या मिनिटास गार्डियन एंजल संघ नशीबवान ठरला नाही. फुलगॅन्सो कार्दोझ याच्या फ्रीकिकने स्पोर्टिंगची बचाव भिंत, तसेच गोलरक्षक ओझेन यांना चकवा दिला होता, मात्र चेंडू गोलपट्टीस आपटल्यामुळे अपेक्षित लक्ष्य साधू शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT