Team India Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup for Blind: टीम इंडिया तिसऱ्यांदा विश्वविजेते; मोदींसह राष्ट्रपतींकडूनही कौतुकाचा वर्षाव

भारतीय क्रिकेट संघाने सलग तिसऱ्यांदा अंधांचा टी20 वर्ल्डकप जिंकला आहे.

Pranali Kodre

T20 World Cup for Blind: शनिवारी अंधांसाठी असलेल्या टी20 वर्ल्डकप 2022च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने 120 धावांनी बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला. यासह भारताने सलग तिसऱ्यांदा हा वर्ल्डकप जिंकण्याचा कारनामा केला आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 विकेट्सच्या मोबदल्यात तब्बल 277 धावा धावफलकावर लावल्या होत्या. भारताकडून सुनील रमेशने 63 चेंडूत नाबाद 136 धावा फटकावल्या, तर कर्णधार अजय कुमार रेड्डीने 50 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. तसेच या दोघांनी 247 धावांची विक्रमी भागीदारीही रचली.

त्यानंतर भारताने दिलेल्या 278 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला 20 षटकांत 3 बाद 157 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना 120 धावांनी जिंकला. भारताकडून ललित मिना आणि अजय कुमारने प्रत्येकी 1 विकेट घेतली. बांगलादेशकडून सलमानने नाबाद 77 धावांची सर्वोच्च खेळी केली. पण त्याला संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले.

दरम्यान, सुनील रमेशला सामन्यातील सामनावीर म्हणून घोषीत करण्यात आले. तसेच विजेत्या भारतीय संघाला 3 लाखाची बक्षीस रक्कम देण्यात आली, तर उपविजेत्या बांगलादेशला दीड लाख बक्षीस रक्कम मिळाली.

भारतीय संघाने मिळवलेल्या या विजयाबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून अनेकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीट करत भारतीय संघाचे कौतुक केले आहे. तसेच आणि राष्ट्रपती भवनाच्या ट्वीटर हँडलवरूनही भारतीय संघाचे अभिनंदन करण्यात आले आहे.

मोदीनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की 'आपल्या खेळाडूंचा भारताला अभिमान आहे. आपण अंधांसाठी असलेल्या टी20 वर्ल्डकप जिंकण्याचा आनंद आहे. आपल्या संघाचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.'

तसेच राष्ट्रपती भवनाच्या ट्वीटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की 'अंधांसाठी असलेल्या टी20 वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन. या संघाने दाखवून दिले आहे की ज्यांच्याकडे धैर्य आणि पक्का निर्धार आहे त्यांच्यासाठी काहीही दुर्गम नाही. हा खरोखरच अभिमानास्पद क्षण आहे. भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा.'

याशिवाय देखील अनेकांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT