Team India: धक्का! टीम इंडियाच्या 'या' धाकडने हॉस्पिटलमधून दिली मोठी अपडेट

Indian Cricket Team: टीम इंडिया सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे, तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी 2022-23 लवकरच सुरु होणार आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Cricket Team: टीम इंडिया सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे, तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी 2022-23 लवकरच सुरु होणार आहे. या सगळ्या दरम्यान टीम इंडियाच्या एका फास्ट बॉलरने आपल्या चाहत्यांना एक धक्कादायक बातमी दिली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा खेळाडू बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटपासून दूर होता. या खेळाडूने टीम इंडियासाठी आशिया कपसारखी मोठी टूर्नामेंटही खेळली आहे.

टीम इंडियाचा हा खेळाडू रुग्णालयात दाखल

भारतीय संघाचा एक युवा वेगवान गोलंदाज सध्या आरोग्याच्या समस्यांशी झुंजत आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून डावखुरा गोलंदाज खलील अहमद (Khalil Ahmed) आहे. खलील अहमद बराच काळ टीम इंडियाचा भाग बनू शकला नाही, तर आता तो रणजी ट्रॉफी 2022-23 पासून सुरु होणाऱ्या काही सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही. याची माहिती त्याने स्वतः त्याच्या चाहत्यांना दिली आहे.

Team India
Team India कडून तब्बल 12 वर्षांनी मिळणार कसोटी खेळण्याची संधी, गोलंदाज म्हणतोय...

ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली

खलील अहमदने नुकताच सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असल्याचे दिसत आहे. फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझ्या प्रिय मित्रांनो, क्रिकेटपासून दूर राहणे हा माझ्यासाठी खूप कठीण काळ आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे या रणजी मोसमात होणाऱ्या बहुतांश सामन्यांमध्ये मी खेळू शकणार नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे.'

टीम इंडियासाठी आशिया कप जिंकला होता

आशिया कप 2018 मध्ये टीम इंडियाचे (Team India) नेतृत्व रोहित शर्माकडे होते. खलील अहमद या आशिया चषकात टीम इंडियाचा भाग होता. टूर्नामेंट जिंकल्यानंतर रोहितने खलील अहमदला ट्रॉफी उचलण्याची संधीही दिली होती. या स्पर्धेत त्याने आपला पदार्पण सामना हाँगकाँगविरुद्ध खेळला होता.

Team India
Team India: नववर्षाची सुरुवात व्यस्त! 3 महिन्यांत 3 संघांविरुद्ध 6 मालिका, पाहा संपूर्ण वेळापत्रक

टीम इंडियात अनेक संधी मिळाल्या

खलील अहमदने टीम इंडियासाठी एकूण 25 सामने खेळले आहेत. त्याने 14 टी-20 सामन्यांमध्ये भारतासाठी 13 विकेट घेतल्या आहेत. तर 8.83 च्या इकॉनॉमीसह धावा दिल्या आहेत. त्याचवेळी, त्याने 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5.81 च्या इकॉनॉमीसह 15 विकेट घेतल्या आहेत. खलीलने नोव्हेंबर 2019 पासून भारतासाठी (India) एकही सामना खेळलेला नाही. आयपीएल 2022 मध्ये दिल्लीकडून खेळतानाही त्याने चांगली कामगिरी केली होती. या मोसमात त्याने 10 सामने खेळताना 16 विकेट घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com